Jump to content

पूजा देशमुख


सौ. पूजा पुष्कराज देशमुख (- ५ ऑक्टोबर,इ.स. १९७२) या महाराष्ट्रातील एक प्रथितयश कीर्तनकार आहेत. नारदीय व राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.कै. ओतुरकरबुवा (प्र. दा. राजर्षि) हे सौ. देशमुख यांचे श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे.

कै. ओतुरकर बुवा यांच्याकडून अनुग्रहित असलेल्या पूजा ताईंचे माहेर कीर्तनकार घराणे आहे. कै. गोपीचंदबुवा कुलकर्णी (बोरकर) यांच्या त्या नात आहेत. गोपीचंदबुवा हे बोरकर घराण्यातले बाराव्या कीर्तनकार पिढीतले हरदास होत.

तसेच, त्यांच्या सासरी, देशमुख कुटुंबात पौरोहित्याची परंपरा असून प्रसिद्ध कीर्तनकार ओतुरकरबुवा हे त्यांचे आतेसासरे होत.

सौ. पूजा पुष्कराज देशमुख

सौ. देशमुख, पुणे या सामाजिक, पौराणिक, ऐतिहासिक तसेच राष्ट्रीय विषयांवर कीर्तन करतात. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही त्या कीर्तनसेवा रुजू करतात. त्यांची ५००० कीर्तनपुष्पे रुजू झालेली आहेत.

त्यांची कीर्तन पद्धत ही 'नारदीय कीर्तन' आहे.


पूजाताई देशमुख या वाणिज्य पदवीधर (बी. कॉम.) आहेत. त्यांचे कीर्तनाचे शिक्षण खालीलप्रमाणे आहे.

  • वासंतिक वर्ग पंचवार्षिक अभ्यासक्रम, तसेच कीर्तन विशारद हा ३ वर्षाचा पदवी अभ्यासक्रम. (श्री. हरिकीर्तनोत्तेजक सभा, पुणे. ) सन २००४ - २००९.
  • कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक, (नागपूर) येथील कीर्तन शास्त्र - बी.ए. सन २००९ - २०११

पुरस्कार

  • कीर्तन सौदामिनी, पैठण, २००८
  • कीर्तन रत्नावली,श्री हरिकीर्तनोत्तेजक संस्था (नारद मंदिर), सदाशिव पेठ, पुणे २०१६