पुसद विधानसभा मतदारसंघ
पुसद विधानसभा मतदारसंघ - ८१ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पुसद मतदारसंघात यवतमाळ जिल्ह्यातील १. पुसद तालुका आणि २. महागांव तालुक्यातील काळी (दौ. खा ) हे महसूल मंडळ यांचा समावेश होतो. पुसद हा विधानसभा मतदारसंघ यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात मोडतो.[१][२]
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंद्रनील मनोहर नाईक हे पुसद विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३] या मतदार संघात एकून ३३६ बूथ आहेत.
आमदार
वर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | इंद्रनील मनोहर नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२०१४ | मनोहर राजुसिंग नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष | |
२००९ | मनोहर राजुसिंग नाईक | राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष |
निवडणूक निकाल
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २००९ | ||
---|---|---|
पुसद | ||
उमेदवार | पक्ष | मत |
मनोहरराव नाईक | राष्ट्रवादी | ७७,१३६ |
डॉ आरती फुपाटे | शिवसेना | ४६,२९६ |
निलय नाईक | अपक्ष | १८,४८६ |
धनंजय गोविंदराव कांबळे | बसपा | २,७३२ |
संभाजी लिंबाजी हडसे | अपक्ष | १,५९२ |
पंजाब तुळशीराम जाधव | अपक्ष | १,५०१ |
उत्तम भागाजी कांबळे | प्ररिप | १,४६५ |
पंकज नामदेवराव पारधे | अपक्ष | ७९२ |
जावेद कुरेशी तथा प्रा. जावेद पाशा | रासप | ७३८ |
मुस्तफा बेग | अपक्ष | ५१६ |
शेख अमीन शेख चट्टू | अपक्ष | ४३३ |
बाह्य दुवे
- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".