Jump to content

पुरुषोत्तम स्वामी

//कल्याणशिष्य श्री पुरुषोत्तम स्वामी कृत श्री कल्याण स्वामींची आरती //

भवहरणा सुखकरणा नीजस्मरणा वरदा \ तव चरणाप्रती शरणागत करुणानीरदा \ न कळे लिळाविग्रह निगमागमवादा \ स्थावर जंगम जग या नातळसी भेदा \\१\\

जय देव जय देव जय जय कल्याणा \ भावातीतानंता सहजा परिपूर्णा \\धृ\\

हरिहर ब्रह्मादिका न कळे पदमहिमा \ विंसित शतरसना ही नेणे तव सीमा\ कुंठीत होये वाचा नाकळवे नेमा \ पुरुषोत्तम तव कृपे विगळीत रूपनामा\\

जय देव जय देव जय जय कल्याणा \ भावातीतानंता सहजा परिपूर्णा \\धृ\\