Jump to content

पुरुषोत्तम मंदिर (पुरुषोत्तमपुरी)

पुरुषोत्तम भगवानाचे संपुर्ण भारतात एकमेव मंदिर फक्त पुरुषोत्तमपुरी येथेच आहे हे तालुका माजलगाव जिल्हा बीड, महाराष्ट्र मध्ये येते. पुरुषोत्तम मास म्हणजे अधिकमास अर्थात धोंड्याचा महिना किंवा मलमास, धोडेमहात्मे या पवित्र ग्रंथात वर्नील्याप्रमाने सालातील बारा महिन्यांचे बारा भगवंत स्वामी आहेत. मात्र सर्वांचा मीळुन उरी सुरी बनलेल्या अधिकमासाचे स्वामीत्व कोनीच स्विकारेना, ते पुरुषोत्तमाने स्विकारले. या गावी दक्षिण कडून गोदावरी नदी आहे. त्यास चक्रतीर्थ असे म्हणतात. त्याची आख्यायिका अशी, पूर्वी शार्दुल नावाचा राक्षस पंचक्रोशीतील जनतेला तो फार त्रास देऊ लागला. म्हणून भगवान पुरुषोत्तम यांनी अवतार घेऊन या राक्षसाचा वध केला आणि ते ज्या चक्राच्या साह्याने त्या राक्षसाचा वध केला ते सुदर्शन चक्र गोदावरी नदीत जाऊन पडले या ठिकाणी आज भाविक तेथे स्नान करतात. स्नान केल्यानंतर शंक, गदा, तथा पशुधारी सावळ्या विठ्ठलाचे अर्थात पुरुषोत्तमाचे दर्शन घेतात. या मंदिराशेजारीच त्रिवेनी संगम मंदिर म्हणून संबोधले जाते या मंदिराची विशेषता म्हणजे वरदविनायक गणपतीची ४ फुट उंचीची मूर्ती, माता पार्वतीच्या पादुका आणी सहालक्षेश्वर शंकराची शिव पिंड. असा त्रिवेणी संगम एकाच मंदिरात ईतरत्र शोधुनही सापडत नाही. या मंदिराच्या गाभाऱ्याची प्रतीमा म्हणजे वृंदावनातील कृष्णमंदिराची प्रतीकृती आहे. येथील विशेष दोन्ही मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. जसे विद्वताचे भक्त पुंडलीक तसे पुरुषोत्तमाचे भक्त पुर्णाश्रमस्वामी यांचाही येथे मठ आहे. गावाच्या दक्षिणेस काशी विश्वेश्वराचे मंदिर आहे. गावापासुन पुर्वेस 9 कि. मी गोदावरी पात्रात भस्माची टेकडी आहे, त्याचा पुर्वोतिहास म्हणजे तेथे ऋषीमुनींचे येथे वास्तव्य होते. त्यांनी केलेल्या यज्ञांची प्रचिती म्हणून आज ही त्या टेकडीत भस्म बघण्यास मिळतो.

बीड जिल्ह्यातील माजलगांव तालुक्यातील श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथील गोदावरीच्या पात्रात मंदिराचे काही पुरातन अवशेष सापडले. माजलगांव पासून २२ कि.मी.अंतरावर असणा-या गोदावरीच्या काठावर असलेल्या पुरुषोत्तमपुरीला पुरुषोत्तमाचे भारतातील एकमेव मंदिर आहे. भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे. तीव्र दुष्काळामुळे गोदावरीचे पात्र कोरडेठाक पडले होते. कोरड्या पडलेल्या या पात्रात काही पूरातन अवशेष सापडले. गोदावरीच्या पात्रात पूर्व पश्चिम प्रवाहात जवळपास हजार फूट अंतरापर्यंत हे अवयव अस्ताव्यस्त पसरले आहेत. त्यात स्तंभशीर्ष, स्तंभस्थळ, जांघा भागेवरील कोरीव दगडे व मंदिराच्या तळाशी विविध घडीव शिळांच्या समावेश आहे याच अवशेषात एक सतीची शिळा असून, ती साडेतीन फूट उंच माझा व दोन फूट रुंद आहे. याच शिळेवर एकूण तीन शिल्पे कोरलेली आहेत. या शिळेवर एक हात दंडापासून कोरला असून तो घोट्यापासून 90 अंशात सरळ वर आशिर्वचनावस्थेत आहे. हाताखालची धावत्या घोड्यावर स्वार व्यक्तिचे शिल्प असून घोड्याचा लगाम धरलेली व्यक्ति पुढे धावते आहे. या शिल्पाखाली पुन्हा तिसरे शिल्प असून त्यात स्त्री पुरुषास रेखाचित्र दाखविण्यासाठी आडवे कोरले आहे. विशेष म्हणजे नदीपात्रात एका प्राचीन घाट उघडा सापडला असून हा घाट यादवांच्याही अगोदरच्या काळातील असावा असा अंदाज जिल्ह्यातील इतिहास संशोधक डॉ. सतीश साळूंके यांनी पुरुषोत्तमपुरी येथे भेट देऊन पाहणी केल्यानंतर केला.

माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी मंदिराचे स्थापत्य कलेतील वेगळेपण असे की मंदिराच्या बांधकामात वापरलेल्या विटा चक्क पाण्यावर तरंगतात. हे मंदिर इसवी सन १३१० मध्ये राजा रामदेव यांनी यांनी उभारले. यामुळेच या गावाला पुरुषोत्तमपुरी हे नाव पडले.आणि पुढचे बांधकाम पुरुषोत्तमपुरी येथील जमीनदार खुशालचंद्र अब्बड यांच्या मुळे पूर्ण झाले. इतिहासाच्या दृष्टीने पुरुषोत्तमपुरीस मोठे महत्त्व असून रामचंद्र देव यादवांचा शेवटचा ज्ञात ताम्रपट इथेच सापडला आहे. आजपर्यंत उपलब्ध सर्व ताम्रपटात हा ताम्रपट वजनाने व आकारानेही मोठा मानला जातो. यात रामचंद्र देव यादवाने मंदिर उभारणीसाठी व मंदिराच्या देखरेखीसाठी पंचक्रोशीतील गावे दान दिल्याचा उल्लेख आहे. पुरुषोत्तमपुरीमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविक अधिक महिन्यात माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरीत पुरुषोत्तमाच्या दर्शनास जातात. अधिक मासात या ठिकाणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. गोदाकाठी राक्षसभूवन, पुरुषोत्तमपुरी, मंजरथ, गंगामसला येथे प्राचीन मंदिरे आहेत. त्यात पुरुषोत्तमपुरीचे मंदिर उल्लेखनीय ठरते.

पुरुषोत्तमपुरी येथील पुरुषोत्तम मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात. झुंबरलाल अब्बड हे पुरुषोत्तमपुरी चे मुखिया होते त्यावेळेस सदर पुरुषोत्तम मंदिर ही पूर्वी कुठेही शासन दरबारी नोंद नव्हती. वर्ष 1980 साली श्री. बाबुराव सहदेव गोळेकर रा.पुरुषोत्तमपुरी ता.माजलगाव जिल्हा बीड यांनी पुरुषोत्तम देवस्थान विश्वस्त संस्था नोंदणीकृत केली. बाबुराव सहदेव गोळेकर हे पुरुषोत्तम देवस्थान विश्वस्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत. तर वासुदेव रामचंद्र कुलकर्णी, बाबासाहेब शेषेराव गोळेकर, नारायण बापूराव गोळेकर, रामकृष्ण तातेराव धिरडे, जनार्दन सुरवसे, लक्ष्मण दादराव सुरवसे हे या विश्वस्त मंडळाचे संस्थापक सदस्य आहेत.

सदर मंदिराचे जीर्णोद्धार होण्यासाठी गावातील भजनी मंडळी 1980 पासून सतत प्रयत्न करत आहेत परंतु सदर मंदिरास पर्यटनाचा दर्जा नव्हता म्हणून सरकारकडून निधी मिळत नसे. 1980 ते 2002 पर्यंत सर्व विश्वस्त आणि भजनी मंडळी आणि भाविक यांचे आर्थिक सहकार्य यातून थोडा थोडा मंदिर जीर्णोद्धार करत होते. वर्षे 2005 मध्ये मा. खासदार जयसिंग गायकवाड पाटील यांचे खासदार फंडातून सभागृह बांधकाम पूर्ण केले. यानंतर भक्त निवासाच्या सोयीसाठी काही बांधकाम पूर्ण केले. नंतरच्या काळात सरकारने दखल घेऊन या मंदिराची पर्यटन म्हणून मंजूरी मिळत आता 2020 साली राज्यातील सरकारने 54 कोटी चा पुरुषोत्तम मंदिर विकास आराखडा मंजुर करून यावर्षी 2023 पासून प्रत्यक्ष विकास काम चालू केले असून लवकरच हे पूर्ण होईल आणि पुढील काळात भाविकांसाठी संपूर्ण सोयींनी युक्त असे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळेल. []

संदर्भ

  1. ^ "पुरूषोत्तमपुरीच्या उद्ध्वस्त मंदिराचे गोदावरी नदीपात्रात अवशेष".[permanent dead link]