Jump to content

पुरुषोत्तम खेडेकर


शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघ या संघटनेचे संस्थापक आहेत. शिवधर्म हा जगातील सतरावा धर्म आहे. अभ्यास व संशोधन करून त्यांनी शिवधर्म स्थापन केला.[] पुरुषोत्तम खेडेकर यांनी १ सप्टेबंर १९९० रोजी जिल्हा अकोला येथे मराठा सेवा संघाची स्थापना केली. बुलढाणा जिल्हयातील चिखली तालुक्यात अंत्री खेडकर हे त्यांचे मूळगाव आहे. सुरुवातीला मुठभर लोकांना घेवुन दलित बहुजन समाजाच्या प्रश्नासाठी आवाज उठविला.[] याच मराठा सेवा संघाला माननारा मोठा वर्ग तयार झाला. २७ वर्षा पासून Z + सुरक्षा नाकारून (संदर्भ हवा) कार्यकर्त्यांच्या हिंमतीवर खेडेकर आजही एकटेच फिरत आहेत. राष्ट्रमाता राजामाता जिजाऊ यांच्या जन्मगावी माहेरी सिंदखेड राजा येथे त्यांनी जिजाऊ जन्मोत्सवाची सुरुवात केली. जिजाऊ सृष्टीवर १२ जानेवारी २००५ साली शिवधर्माची स्थापना झाली. जिजाऊंचे चित्र हीत्यांच्या प्रयत्नाने विधीमंडळात मान्य करून घेण्यातआले. सिंदखेडराजा येथे दरवर्षी जिजाऊ जन्मोत्सवासाठी दरवर्षी सुमारे दहा लाख लोक जमा होतात. याठिकाणी भव्य ग्रंथालय उभारले जाते. पेशाने अभियंता असलेल्या खेडेकर साहेबांनी २१ व्या शतकात विज्ञानावर आधारित समाजबांधणी करून मानवाता वादी मुल्यांची जपणूक करीत बहुजन समाजची नाळ पुन्हा बळीराजा, गौतमबुद्धापर्यंत जोडण्याचे ऐतिहासिक काम केले आहे. बहुजन समाजाला वाचनाची त्यांनी गोडी निर्माण केली. साहित्यिक दशरथ यादव यांनी खेडेकर साहेब यांच्या वर पोवाडा पुरुषोत्तमाचा हे पुस्तक लिहिले आहे. शिवधर्मगाथा ही त्यांनी लिहिली आहे.

महाराष्ट्र बोले। पुरुषोत्तमाशी।आहे गौतमाशी। नाळतुझी।।

शिवाजी माझे। वैभव वाढवी। संभाजीने केली। सीमापार।।१।।

जिजाऊ सावित्री। समाज घडवी। माणूस मढवी। खराखुरा।।

यादवांचे राज्य। भटांमुळे गेले। आंदणच दिले। निजामाला।।२।।


खुप झाले आता। बोल पुरुषोत्तमा। मनुचा खातमा। कर आता।।

होईना सहन। राहिना रे मन। किती झाली घाण। सनातनी।।।३।।

गौतमाचा वसा। चालावया हवा। धर्म कर नवा।  पुरुषोत्तमा।।

तुझ्या विना कोणी। वालीना समाजा। बाकी मारी गमजा। पुरुषोत्तमा।।४।।


शिवाचा तू भक्त। मराठ्यांचे रक्त। गाजवील तक्त। जगताचे।।

अजूनही सत्य। कुणाना कळाले। मुर्खास मिळाले। मुर्ख आता।। ५।।

तुझ्या विचाराने। उठेल वादळ। तुटेल भटाळ। सनातनी।।

धर्मक्रांती तुला। करायची आहे। वळूनना पाहे। पुरुषोत्तमा।।६।।


जगामध्ये आज। क्रांती होते रोज। झाकणारी लाज। नाही बघ।।

हरित धवल। क्रांती झाली फार। माहिती विज्ञान। किती सांगू।।७।।

युगातून कधी। होते धर्मंक्रांती। नको रे विश्रांती। घेऊ आता।।

घ़डायचे आहे। तुमच्या हातून।आलंया आतून। सगळ्यांच्या।।८।।


ब्रम्ह विष्णू महेश। राम कृष्ण हरी। तसाच तू भारी। पुरुषोत्तमा।।

महंमद ख्रिस्त। भगवान बुद्ध। केलया तु सिद्ध। पुरुषोत्तमा।।९।।

फुले शाहू बाबा। शिवाजी संभाजी। तसाच तू आजी। पुरुषोत्तमा।।

स्वाभिमान तुझा। धरतील पिढ्या। मोडतील आड्या। सनातनी।।१०।।

दशरथ यादव यांच्या शिवधर्मगाथे मधील या अभंगातूनही शिवश्री पुरुषोत्तम खेडेकरसाहेब यांच्यावर काव्य लिहिले आहे.

संदर्भ

  1. ^ Novetzke, Christian Lee (2004-01). "The laine controversy and the study of hinduism". International Journal of Hindu Studies (इंग्रजी भाषेत). 8 (1–3): 183–201. doi:10.1007/s11407-004-0008-9. ISSN 1022-4556. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ "'Follow Shivaji's ideals to create a just, peaceful society' - Times of India". The Times of India. 2018-07-17 रोजी पाहिले.