पुराणकथा
सर्वच संस्कृतींमध्ये पुराणकथा असतात. काही कथा काल्पनिक असल्या तरी त्यांच्यामागे ऐतिहासिक घटना असू शकतात. माणसाच्या मनावर चांगले संस्कार ठसवण्यासाठी हिंदू पौराणिक कथांचा मोठाच उपयोग होतो. कथांच्या रूपाने तत्त्वे समजावण्याचे काम पुराणकारांनी केले आहे. या बऱ्याचशा कथा ही रूपकात्मक लिखाणे आहेत. असे असले तरी देशाच्या इतिहासात आणि माणसाला घडविण्यात पुराणे आणि पौराणिक कथा महत्त्वाची भूमिका बजावतात .[ संदर्भ हवा ]
पुराणकथांवरील मराठी पुस्तके
- ग्रीक कथा (प्रा. गो.वि. तुळपुळे)
- ग्रीकपुराण : कथा, महाकाव्य, शोकांतिका (डॉ. सुप्रिया सहस्रबुद्धे)
- ग्रीक पुराणकथा (पंढरीनाथ रेगे)
- ग्रीक महाकाव्ये : महाकवी कवी होमरकृत इलियड व ओडिसी (स्मिता कापसे)