पुरट्चि तलैवर डॉ.एम.जी. रामचंद्रन चेन्नई सेंट्रल – मैसुरु जंक्शन शताब्दी एक्सप्रेस
चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची अतिजलद प्रवासी रेल्वेसेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या प्रतिष्ठित गाड्यांच्या श्रेणीमधील एक असलेली ही शताब्दी एक्सप्रेस तमिळनाडूतील चेन्नई व कर्नाटकातील म्हैसूर शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. दक्षिण रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या ह्या गाडीला वेल्लूर व बंगळूर हे दोनच थांबे असून ती चेन्नई व म्हैसूर दरम्यानचे ४९७ किमी अंतर केवळ ७ तासांत पूर्ण करते.
इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे चेन्नई सेंट्रल–म्हैसूर शताब्दी एक्सप्रेसमध्ये केवळ बसण्याची सोय असून तिला साधारणपणे १ प्रथम श्रेणी तर८ वातानुकुलित खुर्ची याने असतात.
मार्ग
- चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानक
- काटपाडी रेल्वे स्थानक
- बंगळूर सिटी रेल्वे स्थानक
- म्हैसूर रेल्वे स्थानक