पुपुल जयकर
पुपुल जयकर (११ सप्टेंबर, इ.स. १९१५:इटावा, उत्तर प्रदेश, भारत - २९ मार्च, इ.स. १९९७:मुंबई, महाराष्ट्र) या इंग्लिश लेखिका होत्या. त्या भारतीय कला आणि संस्कृतीच्या पुरस्कर्त्या होत्या
पुपुल जयकर यांचे वडील सुरतचे विनायक एन. मेहता अलाहाबाद येथे आय.सी.एस. अधिकारी होते. पुपुल जयकर यांचे बरेचसे बालपण अलाहाबादमध्ये गेले. तेव्हा त्यांचे नेहरू घराण्याशी संबंध जुळले. १९३० साली त्यांचा इंदिरा गांधींशी परिचय झाला. नंतर १९५० साली मुंबईत भेट होऊन त्यांची गाढ मैत्री झाली, ती इंदिरा गांधींच्या १९८४ सालच्या मृत्यूपर्यंत टिकली.
कारकीर्द
लंडन विद्यापीठातील बेडफर्ड महाविद्यालयातून पत्रकारितेची पदवी संपादन केल्यावर पुपुल जयकर यांनी टाइम्स ऑफ इंडियाकडे नोकरीसाठी अर्ज केला. तेव्हा आम्ही तुमचे लेख छापू, पण महिलांना आम्ही नोकरीमध्ये घेत नसतो असे त्यांनी कळवले. लंडनमध्ये असतानाच पुपुल मेहता यांचे बॅरिस्टर मनमोहन मोटाभाई जयकर यांच्याशी लग्न झाले.
इ.स. १९४१ साली काँग्रेस पक्षात सामील झाल्यावर जयकांचीर रावसाहेब पटवर्धन, अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता, युसुफ मेहेरअली यांच्यांशी ओळख झाली. १९४८ साली जे. कृष्णमूर्तींची भेट झाल्यावर जयकर यांच्यावर कृष्णमूर्तींचा प्रभाव पडला.
पुपुल जयकर भारतातील कृष्णमूर्ती फाउंडेशनच्या अध्यक्षा विश्वस्त होत्या. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स आणि जपान येथे झालेल्या भारतीय महोत्सवाच्या त्या मुख्य सूत्रधार होत्या. त्या पुढे इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट ॲन्ड कल्चरल हेरिटेग (इन्टॅक) या संस्थेच्याही अध्यक्ष झाल्या.
संस्थाकीय कामे
इंग्लिश पुस्तके
- इंदिरा गांधी ॲन इंटिमेट बायोग्राफी (इंग्रजी): (मूळ इंग्रजी-१९९२, मराठी अनुवाद - अशोक जैन)[१]
- The Buddha: A Book for the Young (१९८२)
- The Children of Barren Women : (Essays, investigations and stories, १९९४)
- The Earthen Drum: An Introduction to the Ritual Arts of Rural India (१९८०)
- The Earth Mother (१९८९)
- Fire in the Mind : Dialogues with J. Krishnamurti. (१९९५)
- God is not a full stop: and other stories. (१९४९).
- J. Krishnamurti: A Biography (१९८८)
- Textiles and Embroideries of India (१९५६)
- Textiles and Ornaments of India: A Selection of Designs (सहलेखक - जॉन आयर्विन, १९७२)
- What I am ( Indira Gandhi in conversation with Pupul Jayakar, १९८६)
पुरस्कार
- पद्मभूषण (१९६७)