Jump to content

पुणे−सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस

पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस

पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. शताब्दी एक्सप्रेस ह्या भारतामधील सर्वात वेगाने प्रवास करणाऱ्या व संपूर्ण वातानुकूलित गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे ते हैदराबाद शहरांदरम्यान आठवड्यातून सहा दिवस धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसला पुणे रेल्वे स्थानक ते सिकंदराबाद रेल्वे स्थानक दरम्यानचे ५९७ किमी अंतर पार करायला ८ तास व ३० मिनिटे लागतात.

डब्यांची रचना

इतर शताब्दी एक्सप्रेस गाड्यांप्रमाणे पुणे सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये फक्त आसनाची सोय असून शयनयान सेवा उपलब्ध केली जात नाही. साधारणपणे ८ वातानुकुलीत चेअर कार व १ एक्झेक्युटिव्ह कार ह्या गाडीमध्ये असते. पुणे हैदराबाद मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. ह्या गाडीची वाहतूक इलेक्ट्रिक इंजिन वापरून केली जाते.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२२०५पुणे – सिकंदराबाद०५:५०१४:२०मंगळखेरीज रोज
१२२०६सिकंदराबाद – पुणे१४:४५२३:१०मंगळखेरीज रोज

मार्ग

क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे रेल्वे स्थानक
SUR सोलापूर२६४
GR गुलबर्गा३७७
WADI वाडी ४१४
TDU तांडूर ४८४
VKB विकाराबाद५२५
BMT बेगमपेट ५९३
SC सिकंदराबाद ५९७

बाह्य दुवे