Jump to content

पुणे−नागपूर गरीब रथ एक्सप्रेस

पुणे−नागपूर गरीब रथ एक्सप्रेसचा फलक
पुणे−नागपूर गरीब रथ एक्सप्रेसचा मार्ग

पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची एक जलद प्रवासी सेवा आहे. गरीब रथ ह्या किफायती दरात पूर्णपणे वातानुकुलीत प्रवाससेवा पुरवणाऱ्या विशेष गाड्यांपैकी एक असलेली ही रेल्वे पुणे रेल्वे स्थानक ते नागपूर रेल्वे स्थानक ह्यांदरम्यान आठवड्यातून तीनदा धावते. मध्य रेल्वेमार्गे धावणाऱ्या पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेसला पुणे ते नागपूर दरम्यानचे ८९० किमी अंतर पार करायला १५ तास व ४५ मिनिटे लागतात.

तपशील

वेळापत्रक

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२११३पुणे – नागपूर१७:४००९:२५सोम, बुध, शुक्र
१२११४नागपूर – पुणे१८:३५०९:४५मंगळ, गुरू, शनि

मार्ग

क्रम स्थानक संकेत स्थानक नाव अंतर (किमी)
PUNE पुणे रेल्वे स्थानक
DD दौंड ७६
ANG अहमदनगर१६०
MMR मनमाड ३१३
BSL भुसावळ ४९७
AK अकोला ६३७
BD बडनेरा७१६
WR वर्धा ८११
NGP नागपूर ८९०

बाह्य दुवे