Jump to content

पुणे जंक्शन रेल्वे स्थानक

पुणे
मध्य रेल्वे स्थानक
महात्मा गांधी स्मारक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता आगा खान रोड, पुणे - ४३१००१, पुणे जिल्हा
गुणक18°31′44″N 73°52′21″E / 18.52889°N 73.87250°E / 18.52889; 73.87250
मार्गमुंबई-चेन्नई मार्ग
पुणे-बंगळूर मार्ग
फलाट
इतर माहिती
उद्घाटन २७ जुलै १९२५
विद्युतीकरण होय
संकेत PUNE
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग मध्य रेल्वे
सेवा
पुणे उपनगरी रेल्वे
स्थान
पुणे is located in महाराष्ट्र
पुणे
पुणे
महाराष्ट्रमधील स्थान

पुणे जंक्शन किंवा पुणे रेल्वे स्थानक हे पुणे शहरामधील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक पुणे शहराला भारतातील बहुतेक सर्व प्रमुख शहरांशी जोडते. 'मुंबई-पुणे-सोलापूर-गुलबर्गामार्गे चेन्नई' आणि 'पुणे-मिरज-हुबळीमार्गे बंगळूर' हे दोन लोहमार्ग पुणे शहराशी जोडलेले आहेत. उपरोक्त दोन्ही लोहमार्गावरून जाणाऱ्या सर्व 'मेल-एक्स्प्रेस-जलद-संपर्कक्रांती' इत्यादी गाड्या पुणे स्थानकात थांबतात.

१९३० च्या दशकात सुरू झालेली 'पुणे-मुंबई डेक्कन क्वीन' ही तत्कालीन भारतातील सर्वांत वेगवान एक्स्प्रेस मानली जात असे, त्या काळी डेक्कन क्वीन 'पुणे-मुंबई' हे अंतर केवळ अडीच तासांत (सध्या साडेतीन तास) पूर्ण करत असे. या स्वातंत्र्यपूर्व काळापासून अव्याहत चालणाऱ्या वेगवान एक्स्प्रेसचा वाढदिवस प्रतिवर्षी १ जूनला या स्थानकात साजरा केला जातो.

आंतरराष्ट्रीय स्तराची स्थानके बनविण्यासाठी भारतातील ज्या प्रमुख स्थानकांची निवड झाली त्यात 'पुणे जंक्शन' समाविष्ट करण्यात आले आहे.

इतिहास

स्वातंत्र्यपूर्व काळात १८५३ मध्ये भारतात पहिली रेल्वे 'बोरीबंदर ते ठाणे' दरम्यान धावू लागली. तत्पश्चात ३ वर्षांत 'मुंबई-पुणे' लोहमार्ग बांधून पूर्ण झाला. १८८६ साली 'पुणे-मिरज' हाही लोहमार्ग बांधण्यात आला, मात्र तत्कालीन 'पुणे-मिरज' मार्ग मीटरगेज पद्धतीचा होता.

महत्त्वाच्या गाड्यांची यादी

पुणे स्थानकामधून सुटणाऱ्या एक्सप्रेस गाड्या

गाडी क्रमांकनावकधी
०१६५५ / ०१६५६पुणे – जबलपूर एक्सप्रेसमंगळ
०२५११ / ०२५२२पुणे – कामाख्य एक्सप्रेसगुरू
०२५११ / ०२५२२पुणे – भुवनेश्वर एक्सप्रेसमंगळ
११००७ / ११००८डेक्कन एक्सप्रेसरोज
११००९ / ११०१०सिंहगड एक्सप्रेसरोज
११०२५ / ११०२६पुणे – भुसावळ एक्सप्रेसरोज
११०३३ / ११०३४पुणे – दरभंगा ज्ञानगंगा एक्सप्रेसबुध
११०३७ / ११०३८पुणे – गोरखपूर एक्सप्रेसगुरू
११०७७ / ११०७८पुणे – जम्मू तावी झेलम एक्सप्रेसरोज
११०८७ / ११०८८पुणे – वेरावळ एक्सप्रेसगुरू
११०८९ / ११०९०पुणे – भगत की कोठी एक्सप्रेसरवि
११०९१ / ११०९२पुणे – भुज एक्सप्रेससोम
११०९५ / ११०९६अहिंसा एक्सप्रेसबुध
११०९७ / ११०९८पुणे – एर्नानुलम पूर्णा एक्सप्रेस (मिरजमार्गे)शनि
१११०१ / १११०२पुणे – ग्वाल्हेर एक्सप्रेससोम
११४०५ / ११४०६पुणे – अमरावती एक्सप्रेसरवि, शुक्र
११४०७ / ११४०८पुणे – लखनौ एक्सप्रेसमंगळ
१२०२५ / १२०२६पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्सप्रेसमंगळखेरीज रोज
१२१०३ / १२१०४पुणे – लखनौ एक्सप्रेसशुक्र
१२११३ / १२११४पुणे नागपूर गरीब रथ एक्सप्रेससोम, बुध, शनि
१२१२३ / १२१२४डेक्कन क्वीनरोज
१२१२५ / १२१२६प्रगती एक्सप्रेसरोज
१२१२७ / १२१२८मुंबई पुणे इंटरसिटी एक्सप्रेसरोज
१२१२९ / १२१३०आझाद हिंद एक्सप्रेसरोज
१२१३५ / १२१३६पुणे – नागपूर एक्सप्रेसरवि, मंगळ, गुरू
१२१४९ / १२१५०पुणे – पाटणा एक्सप्रेसरोज
१२१५७ / १२१५८हुतात्मा एक्सप्रेसरोज
१२१६९ / १२१७०पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेसरोज
१२२२१ / १२२२२पुणे – हावडा दुरंतो एक्सप्रेससोम, शनि
१२२६३ / १२२६४पुणे – हजरत निजामुद्दीन दुरंतो एक्सप्रेसमंगळ, शुक्र
१२२९७ / १२२९८पुणे – अहमदाबाद दुरंतो एक्सप्रेससोम, गुरू, शनि
१२७२९ / १२७३०पुणे – नांदेड एक्सप्रेस (मनमाडमार्गे)सोम, बुध
१२८४९ / १२८५०पुणे – बिलासपूर एक्सप्रेसशुक्र
१२९३९ / १२९४०पुणे – जयपूर एक्सप्रेसरवि, बुध
१५०२९ / १५०३०पुणे – गोरखपूर एक्सप्रेसशनि
१७०१३ / १७०१४पुणे – हैदराबाद एक्सप्रेससोम, बुध, शनि
१७६१३ / १७६१४पुणे – नांदेड एक्सप्रेस (लातूरमार्गे)मंगळ, गुरू, शनि
१९३११ / १९३१२पुणे−इंदूर एक्सप्रेसरवि, बुध खेरीज रोज
२२१०५ / २२१०६इंद्रायणी एक्सप्रेसरोज
२२१३१ / २२१३२ज्ञानगंगा एक्सप्रेससोम
२२१४९ / २२१५०पूर्णा एक्सप्रेस (पनवेलमार्गे)रवि, बुध
२२८४५ / २२८४६पुणे – रांची एक्सप्रेसरवि, बुध
२२८८१ / २२८८२पुणे – भुवनेश्वर एक्सप्रेसगुरू

ह्याव्यतिरिक्त मुंबईहून कोल्हापूर, लातूर, सोलापूर, हैदराबाद, बंगळूर, चेन्नई, नागरकोविल, भुवनेश्वर, कोइंबतूर या ठिकाणी जाणा-या सर्व रेल्वे-एक्स्प्रेस पुणे स्थानकात थांबतात. दिल्लीहून बंगळुराला जाणारी कर्नाटक संपर्क क्रांती एक्सप्रेस ही गाडी पुण्याला थांबते.

महाराष्ट्रातील पर्यटनाभिमुख गाडी डेक्कन ओडिसी हिच्या मार्गावरही पुणे हे एक ठिकाण आहे.

पुणे स्थानकातून सुटणाऱ्या उपनगरीय रेल्वे

पुणे स्थानकातून तळेगाव आणि लोणावळा या ठिकाणी उपनगरी लोकल्स सुटतात. सध्या दिवसभरात १९ लोकल लोणावळ्याला आणि २ लोकल तळेगावला सुटतात. सर्व लोकल 'विद्युत मोटर'वर चालणा-या आणि १२ डब्यांच्या आहेत.

समस्या आणि आव्हान

पुणे हे देशातील सातव्या क्रमांकाचे महानगर असून मागील दोन दशकांत पुण्याच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबर पुण्याच्या रेल्वे स्थानकावरही काही समस्या आणि आव्हाने निर्माण झाली आहेत.

प्रमुख समस्या

१] एककेंद्रित गर्दी :- वाढत्या गर्दीचे विभाजन करण्याच्या हेतूने प्रमुख महानगरांत दोन किंवा अधिक रेल्वे टर्मिनस बांधण्यात आली आहेत. उदाहरण - दिल्लीत 'आनंद विहार', 'निजामुद्दीन', 'दिल्ली सराय रोहिल्ला', नवी दिल्ली' आणि 'जुनी दिल्ली' असे पाच टर्मिनस आहेत. मुंबईतसुद्धा ५ टर्मिनस आहेत. कलकत्ता येथे ३ तर बंगळूर, पटना आणि चेन्नई येथे २ टर्मिनस आहेत.

तथापि, पुण्यात अद्यापि 'पुणे जंक्शन' हे एकमेव टर्मिनस असल्याने या स्थानकावर ताण पडत आहे.

२] अस्वच्छता :- वाढत्या गर्दीचा परिणाम हा स्थानकातील 'स्वच्छता आणि सुव्यवस्था' राखण्यावर होत आहे.

३] अपुरे प्लॅटफाॅर्म :- पुणे जंक्शन स्थानकात सध्या ६ प्लॅटफाॅर्म आहेत. प्रचंड गर्दी आणि गाड्यांची संख्या यामुळे उपलब्ध प्लॅटफाॅर्मवर ताण येत आहे.

प्रमुख आव्हाने

१] विस्तारीकरण : पुणे स्थानक मध्यवस्तीत असल्याने रेल्वे स्थानकाचे विस्तारीकरण हे एक आव्हान आहे.

२] सुरक्षा व्यवस्था : गर्दी वाढत असल्याने सुरक्षा व्यवस्था हेही आव्हान आहे.

३] जलद वाहतूक : मुंबई आणि पुणे ही महानगरे बंगळूर, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद आणि चेन्नई या शहरांशी जलद गाड्यांनी जोडण्याची आवश्यकता आहे. मात्र, 'दौंड-गुलबर्गा' या भागात अद्याप पूर्णतः विद्युतीकरण आणि दुपदरीकरण न झाल्याने सद्यस्थितीत दक्षिण भारताशी वेगवान गाड्या चालविताना आव्हान येत आहे.

४] गाड्यांची संख्या वाढविणे : उपलब्ध मार्गावर नवीन गाड्या सुरू करताना काही आव्हाने आहेत. विशेषतः उपनगरी गाड्यांची संख्या वाढविण्याची मागणी आहे, मात्र स्वतंत्र लोकलसाठी लोहमार्ग नसल्याने हे एक आव्हान आहे.

प्रमुख प्रस्ताव

पुणे रेल्वे स्थानकाच्या संदर्भात विविध विचारवंत आणि पुण्यातील प्रवासी संघटना यांनी पुढील प्रस्ताव ठेवले आहेत.

१] पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वेमार्ग बांधणे (हा प्रस्ताव संमत झाला आहे)

२] कर्जत-पनवेल या मार्गाचा कार्यक्षम वापर करून पुणे शहर कोकण रेल्वेशी जोडणे.

३] पुणे-वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद अतिवेगवान बुलेट ट्रेन मार्ग (प्रस्ताव संमत झाला आहे)

४] पुण्याहून राजस्थानकडे नियमित गाडी चालू करणे.

५] उपनगरी लोकल्सची संख्या विशेषतः गर्दीच्या सायंकाळच्या वेळी वाढविणे.

६] पुणे-मुंबई सेंट्रल अशी गाडी सुरू करण्याची प्रवाशांची मागणी आहे.जेणेकरून छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वेस्थानकावरील गर्दीचा ताण कमी होईल तसेच पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वे जोडली जाईल व मुंबईच्या पश्चिम भागात जाण्यासाठी पुण्याहून थेट सेवा मिळेल.

७] लोणी काळभोर येथे नवीन रेल्वे टर्मिनस उभारणे जेणेकरून येथून जवळच होणाऱ्या विमानतळाशी वाहतूक जोडली जाईल.

८] पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे पूर्णपणे विद्युतीकरण आणि दुहेरीकरण करणे.

९]पुणे-नवी दिल्ली-जुनी दिल्ली राजधानी गाडी सुरू करणे.

१०]पुणे-सातारा उपनगरी सेवा सुरू करणे.

११]पुणे-मुंबई गाड्या हार्बर लाईन मार्गे सुरू करणे जेणेकरून नवी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची सोय होईल.

१२]चर्चगेटला जाण्यासाठी खानपान कोच सहित गाडी सुरू करणे.

१३]लोणावळा पर्यंत चौपदरी लोहमार्ग करणे जेणेकरून मुंबई उपनगरी रेल्वेच्या धरतीवर जलद उपनगरी गाड्या सुरू करता येतील आणि इतर एक्सप्रेस गाडयांकरिता विशेष मार्ग मिळेल.

१४]पुणे रेल्वे स्थानकावरील उपनगरी गाडयांचे विशेष टर्मिनस शिवाजीनगर(पुणे पश्चिम) व हडपसर(पुणे पूर्व) अशा रितीने बांधण्यात यावे जेणेकरून मुख्य पुणे रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल.

१५]पुण्याच्या पश्चिम भागात(बावधन,पाषाण,बाणेर) प्रस्तावित रिंग रोडला लागून नवीन लोहमार्ग टाकणे व कोथरुड येथे रेल्वे जंक्शन उभारणे.

१६]दर एक तासाला मुंबई पुणे मुंबई शटल सेवा सुरू करणे.

शोभिवंत फलाट

पुणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक १ भिंत चारशे मीटर लांबीची आहे. या भिंतीवर मयुरेश्वर, भीमाशंकर, नान्नज आणि रेहेकुरी या अभयारण्यांतील जैवविविधता १०५ चित्रांच्या रूपात साकरण्यात आली आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे