पु.भा. भावे पुरस्कार
भाषाप्रभु पु.भा.भावे समिती, ही दरवर्षी मराठी लेखक कै. पुरुषोत्तम भास्कर भावे यांच्या नावाने पुरस्कार प्रदान करत असते. भावे यांच्या स्मृतिदिनी म्हणजे १३ ऑगस्टला हे पुरस्कार जाहीरपणे दिले जातात. पाच हजार रुपये रोख, ग्रंथसंच, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असते. इ.स.२०१२ सालच्या पुरस्कारप्राप्त व्यक्ती पुढीलप्रमाणे :-
- पु.भा.भावे चित्रपट दिग्दर्शन पुरस्कार : राजदत्त (पत्रकारिता)
- पु.भा.भावे पत्रकारिता पुरस्कार : विक्रमसिंह ओक
- पु.भा.भावे समाजसेवा पुरस्कार : वामनराव पै (मरणोत्तर)
- पु.भा.भावे सामाजिक कार्य पुरस्कार : कुटुंब संस्थेचा प्रसार करणाऱ्या अपर्णा रामतीर्थकर
- पु.भा.भावे साहित्यसेवा पुरस्कार : भा.द. खेर (मरणोत्तर)
हे सुद्धा पहा : पुरस्कार ; पुरुषोत्तम भास्कर भावे