पीटर ओडेम्विंगी
पीटर ओडेम्विंगी (रशियन: Питер Осазе Одемвингие; १५ जुलै १९८१ , ताश्केंत, उझबेक सोसाग, सोव्हिएत संघ) हा एक नायजेरियाचा फुटबॉल खेळाडू आहे. २००२ सालापासून नायजेरिया राष्ट्रीय संघाचा भाग असलेला ओडेम्विंगी २०१० व २०१४ फिफा विश्वचषक ह्या स्पर्धांमध्ये नायजेरियासाठी खेळला आहे. २०१४ पासून ओडेम्विंगी इंग्लंडच्या प्रीमियर लीगमधील स्टोक सिटी एफ.सी. ह्या क्लबासाठी खेळत आहे.