Jump to content

पीएसएलव्ही सी-१६

पीएसएलव्ही 'सी-१६' या पीएसएलव्ही रॉकेटच्या साह्याने भारताने उपग्रह सोडले.

पेलोड

त्यात १४० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेला व १२०६ किलो वजनाचा दूरसंवेदन उपग्रह 'रिसोर्ससॅट-२' आणि अन्य दोन 'लघु' उपग्रह (मायक्रो सॅटेलाइट) ८२२ किलोमीटर उंचीवरील ध्रुवीय कक्षेत सोडले आहेत.

  • 'रिसोर्ससॅट-२' हा उपग्रह पिकांच्या, जंगलाच्या व जलसाठ्याच्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. २००३साली सोडण्यात आलेल्या 'रिसोर्ससॅट-१' या उपग्रहाची जागा 'रिसोर्ससॅट-२' घेईल. हा उपग्रह २८ एप्रिल पासून कार्यरत होईल व त्याच्याकडून छायाचित्रे मिळतील. जगातील १५ देश या उपग्रहाची छायाचित्रे वापरणार आहेत.
  • 'युथसॅट' हा ९२ किलो वजनाचा छोटा उपग्रह भारत-रशिया यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. तो ताऱ्यांचा व वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.
  • दुसरा लघु उपग्रह १०६ किलोचा 'एक्स-सॅट' हा असून तो सिंगापूरच्या नान्यांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीने तयार केला आहे.