पी.एस.एल.व्ही.
धृवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (P.S.L.V) ( Polar Satellite Launch Vehicle ) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थचे भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण यान आहे. इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. केवळ भारतीय नव्हे तर इतरही देशांचे उपग्रह सुद्धा अवकाशात पाठवुन परकीर चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पर्धेत भारताला आघाडीत आणण्यात याचा महत्त्वाचा वाटा आहे.
या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये "इस्रो'ने याचा वापर करून एकाचवेळेस दहा उपग्रह प्रक्षेपित करून विश्वविक्रमाची नोंद केली होती. हे संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून इस्रो (ISRO - Indian Space Reasearch Orgnization) ने केली आहे. पी.एस.एल.व्ही. भुस्थिर कक्षेत उपग्रह नेऊ शकते. आतापर्यंत १९ भारतीय तर २२ विदेशी असे ४१ भूस्थिर उपग्रह इस्त्रोने अवकाशात यशस्वी रित्या पाठवले आहेत. पी.एस.एल.व्ही.च्या एका उड्डाणाचा खर्च साधारण १.७ करोड अमेरिकन डॉलर इतका आहे.
पीएसएलव्हीच्या उड्डाणांचा इतिहास
वाहक नाव | सामुग्री/उपग्रह | तारीख | यशस्वी/अयशस्वी |
---|---|---|---|
पीएसएलव्ही डी १ | आयआरएस १ इ | २० सप्टेंबर १९९३ | अयशस्वी |
पीएसएलव्ही डी २ | आयआरएस पी-२ | १५ ऑक्टोबर १९९४ | यशस्वी |
पीएसएलव्ही डी ३ | आयआरएस पी-३ | २१ मार्च १९९६ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी १ | आयआरएस १-डी | २९ सप्टेंबर १९९७ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी २ | ओशनसॅट (आयआरएस पी-४), किटसॅट-३, टय़ुबसॅट | २६ मे १९९९ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ३ | टेस | २२ ऑक्टोबर २००१ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ४ | कल्पना-१(मेटसॅट) | १२ सप्टेंबर २००२ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ५ | रिसोर्ससॅट-१ (आयआरएस पी-६) | १७ ऑक्टोबर २००३ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ६ | कार्टोसॅट-१ व हॅमसॅट | ५ मे २००५ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ७ | कार्टोसॅट-२ व एसआरई-१ लापान-टय़ुबसॅट, पेह्य़ुनसॅट-१ | १० जानेवारी २००७ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ८ | एगाईल | २३ एप्रिल २००७ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी १० | टेकसार | २३ जानेवारी २००८ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ९ | कार्टोसॅट-२ ए, आयएमएस-१ व आठ नॅनो उपग्रह | २८ एप्रिल २००८ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी ११ | चांद्रयान-१ | २२ ऑक्टोबर २००८ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी १२ | रिसॅट-२ व अनुसॅट | २० एप्रिल २००९ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी १४ | ओशनसॅट-२ व सहा नॅनो उपग्रह | २३ सप्टेंबर २००९ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी १५ | कार्टोसॅट-२ बी व चार उपग्रह | १२ जुलै २०१० | यशस्वी |
पीएसएलव्ही सी १६ | 'रिसोर्ससॅट-२' व दोन नॅनो उपग्रह | २० एप्रिल २०११ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी१७ | जीसॅट-१२ | १५ जुलै २०११ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी१८ | मेघाट्रॉपिक्स, जुगनू, एस.आर.एम.सॅट, व्हेसलसॅट | १२ ऑक्टोबर २०११ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-१९ | रिसॅट १ | २६ एप्रिल २०१२ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२१ | स्पॉट-६, प्रोइटर्स | ९ सप्टेंबर इ.स. २०१२ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२० | सरल, सफायर, नेओसॅट, टगसॅट-१, युनिब्राईट, स्ट्रॅंड-१, अयुसॅट-३ | २५ फेब्रुवारी इ.स. २०१३ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२२ | आयआरएनएसएस १ ए | १ जुलै इ.स. २०१३ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२३ | स्पॉट-७ व इतर | ३० जून इ.स. २०१४ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२४ | आयआरएनएसएस १ बी | ४ एप्रिल इ.स. २०१४ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२५ | मंगलयान | ५ नाेव्हेंबर इ.स. २०१३ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-२६ | आयआरएनएसएस १ सी | १६ ऑक्टोबर इ.स. २०१४ | यशस्वी |
पीएसएलव्ही सी-३७ | कार्टोसॅट-२ डी,आयएनएस-१ए, आयएनएस-१बी | १५ फेब्रुवारी इ.स. २०१७ | यशस्वी[१] |
संदर्भ आणि नोंदी
- ^ लोकसत्ता (मराठी) PSLV C37 launch : 'अबतक १०४'; इस्त्रोने रचला इतिहास! Check
|दुवा=
value (सहाय्य). १५/०२/२०१७ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)