पी.एच. मूल्य
पी. एच. मूल्य किंवा सामू हे द्रावण आम्ल आहे वा विम्ल अल्कली ते मोजण्याचे एकक आहे. सर्वसाधारणपणे कुठल्याही पदार्थाचा सामू जर सात या अंकावर असेल तर तो पदार्थ उदासीन क्रिया दर्शवितो. (उदा. दूध, मूत्र, रक्त, लाळ, इ.) सातच्या खाली असणारे बिंदू आम्लता दर्शवितात (उदा. लिंबू, ऍसिड) , तर सातच्या वरील बिंदू हे अल्कली (विम्लता) दर्शवितात. (उदा. खारे पाणी, खाण्याचा सोडा, साबणाचे पाणी, इ. )
पी. एच. म्हणजे पोटेन्शिअल ऑफ हायड्रोजन (हायड्रोजनचे प्रमाण किंवा कारकता). पी. एच.ची संकल्पना डॅनिश रसायनशास्त्रज्ञ सोरन्सन (१८६८ - १९३९) याने मांडली.