Jump to content

पी. शिवशंकर

पुंजला शिवशंकर (१० ऑगस्ट, इ.स. १९२९ - २७ फेब्रुवारी, इ.स. २०१७) हे एक भारतीय राजकारणी होते. ते परराष्ट्र मंत्री, कायदा आणि पेट्रोलियम मंत्री होते. ते इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळातील अत्यंत प्रभावशाली मंत्री होते आणि भारतातील सर्वात वरिष्ठ राजकारण्यांपैकी एक होते. इ.स. १९९४ ते १९९५ पर्यंत ते सिक्कीमचे राज्यपाल होते आणि १९९५ ते १९९५ दरम्यान ते केरळचे राज्यपाल होते.