पिवळा समुद्र
पिवळा समुद्र (चिनी: 黄海) हा पूर्व चीन समुद्राच्या उत्तर भागाला उल्लेखण्यासाठी वापरले जाणारे नाव आहे. खुद्द पूर्व चीन समुद्र प्रशांत महासागराचा एक घटक समुद्र आहे. मुख्यभू चीन व कोरियन द्वीपकल्प यांच्या दरम्यान पिवळा समुद्र पसरला आहे. गोबीच्या वाळवंटातून येणाऱ्या धुळीच्या वादळांमुळे वाहून येणाऱ्या धुळीने या समुद्राचे पाणी सोनेरी-पिवळे बनते; त्यावरून त्याचे नाव पिवळा समुद्र असे पडले आहे.