पिंपरी (माळशिरस)
?पिंपरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | माळशिरस |
जिल्हा | सोलापूर जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
पिंपरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० अंश सेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सियस असते.
या गावाचा मुख्य व्यवसाय शेती आहे गावाला दक्षिण पश्चिम बाजूने खूप मोठी डोंगररांग आहे शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेल्या या गावात रानबा देव व लोणार बाबा हे मुख्य देवस्थान आहेत दरवर्षी या गावांमध्ये दिवाळीच्या दरम्यान खूप मोठी यात्रा भरते या यात्रे करता महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात पाण्याचा अभाव असल्याकारणाने शेती आठ महिने असते त्यामुळे शेतीवर संपूर्ण कुटुंबाची उपजीविका करणे शक्य होत नाही त्यामुळे तरुण वर्ग हा शहराकडे वळलेला आहे तर काही वर्ग सहा महिने ऊस तोडीसाठी बाहेरगावी जात असतो गावामध्ये अशिक्षित पणाचे प्रमाण बऱ्यापैकी होते परंतु अलीकडे तरुण मुले पोलीस भरती वकिली इंजीनियरिंग शिक्षक भरती अशा क्षेत्रांमध्ये स्वतःचे कारकीर्द करण्याकडे लक्ष देत आहे