पिंडी क्लब मैदान
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | रावळपिंडी, पाकिस्तान |
आसनक्षमता | १५,००० |
मालक | पाकिस्तान क्रिकेट बोर्ड |
एकमेव क.सा. | २७ मार्च १९६५: पाकिस्तान वि. न्यूझीलंड |
प्रथम ए.सा. | २७ मार्च १९६५: पाकिस्तान वि. वेस्ट इंडीज |
अंतिम ए.सा. | २७ मार्च १९६५: पाकिस्तान वि. इंग्लंड |
शेवटचा बदल ६ जानेवारी २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
पिंडी क्लब मैदान हे पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येते.
२७ मार्च १९६५ रोजी पाकिस्तान आणि न्यू झीलंड संघामध्ये या स्टेडियमवर पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळविण्यात आला. तर ४ डिसेंबर १९८५ रोजी या मैदानावरचा पहिला वहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज संघांमध्ये खेळविण्यात आला.
इसवी सन १९९२ मध्ये रावळपिंडीतच नवीन रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम बांधल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी ह्या मैदानाचे महत्त्व कमी झाले.