पिंगट गरुड
पिंगट गरुड | ||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
प्रजातींची उपलब्धता | ||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||
| ||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स (टेमिंक, १८२८) | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स | ||||||||||||
इतर नावे | ||||||||||||
ॲक़्विला रॅपॅक्स रॅपॅक्स |
सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो.[२] तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.[३]
वर्णन
सुपर्ण हा आकारमानाने घारीपेक्षा मोठा व नेपाळी गरुडापेक्षा छोटा असतो. त्याची लांबी ६० ते ७५ सेमी पर्यंत असते. त्याचा रंग गडद उडी ते मातकट बदामी असतो. पाय पिसांनी झाकलेले असतात.
तो अपमार्जक व परभक्षक दोन्ही आहे. ससाणे, घारी व छोट्या शिकारी पक्ष्यांकडे भक्ष्य पाहून उत्तेजित होतो व ते भक्ष्य पळवतो. गिधाडांबरोबर मृत जनावरे देखील खातो परंतु अलीकडील काळात हे दृश्य दुर्मीळ झाले आहे.
संदर्भ व नोंदी
- ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल. "ॲक्विला रॅपॅक्स". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. २३-०४-२०१७ रोजी पाहिले.
|अॅक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link) - ^ चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश.
- ^ बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण ॲन्ड मलबार - सतीश पांडे