Jump to content

पावलो कोएलो

पावलो कोएलो

पावलो कोएलो (२४ ऑगस्ट, १९४७) हे एक प्रसिद्ध ब्राझिलियन लेखक आणि गीतकार आहेत.

त्यांचा जन्म रियो दे जेनेरो, ब्राझील येथे झाला. ते जेसुइट शाळेत शिकले. कुमारवयात कोएलो यांना लेखक बनायचे होते. जेव्हा त्यांनी आपल्या आईला हे सांगितले तेव्हा त्या उत्तरल्या," माझ्या बाळा, तुझे वडील एक अभियंता आहेत. ते तर्कशुद्ध आणि योग्य विचार करतात, व त्यांना या जगाची स्पष्ट ओळख आहे. लेखक बनणे म्हणजे नक्की काय हे तुला कळले आहे का?" त्यावर कोएलो यांनी संशोधन केले आणि असा निष्कर्ष काढला की लेखक 'कायम चष्मा घालतो व कधीच केस विंचरत नाही' आणि 'स्वतःच्या पिढीला कधीही आपले विचार समजू न देणे ही त्याची जबाबदारी व त्याचे कर्तव्य असते'. अवघ्या १६ वर्षांचे असताना कोएलोंच्या अबोलपणामुळे व पारंपारिक मार्गांना विरोध करण्यामुळे त्यांच्या पालकांनी त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल केले होते. तिथल्या त्यांच्या वास्तव्यात ते तीन वेळा पळून गेले होते. ते २० वर्षांचे असताना त्यांना तिथून सोडण्यात आले. त्या काळाबद्दल कोएलो नंतर एकदा म्हणाले, "त्यांना मला इजा करायची नव्हती ,त्यांना फक्त काय करावे ते कळत नव्हते. त्यांनी तसे मला उध्वस्त करायला नव्हे तर मला वाचवायला केले होते."

'द अलकेमिस्ट' [१] हे त्यांचे सर्वात गाजलेले पुस्तक असून सन २००५ पर्यंत त्याच्या ४.३ दशलक्ष प्रती विकल्या गेल्या आहेत. हे पुस्तक जगातील ५६ भाषांत प्रकाशित झाले आहे. याखेरीज 'व्हेरोनिका डिसाइड्स टू डाय', 'इलेवन मिनिट्स', ' द फ़िफ़्थ माउन्टेन' आणि 'द डेव्हिल ऍण्ड मिस प्रॅम' ही त्यांची प्रसिद्ध पुस्तके आहेत. त्यांना फ़्रांसचा लेजिअन द ऑनर, वर्ल्ड एकोनोमीक फ़ोरमचा क्रिस्टल अवार्ड ही पारितोषिके मिळाली आहेत. कोएलो हे जगाला प्रेरणा देणारे एक लेखक आहेत. [२] Archived 2007-09-11 at the Wayback Machine.8.shtml[permanent dead link]