पालो आल्टो (कॅलिफोर्निया)
हा लेख कॅलिफोर्नियातील शहर पालो आल्टो याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पालो आल्टो (निःसंदिग्धीकरण).
पालो आल्टो अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. सांता क्लारा काउंटीच्या वायव्य कोपऱ्यात असेलेल्या या शहराची स्थापना लेलॅंड स्टॅनफर्डने स्टॅनफर्ड विद्यापीठाबरोबरच केली. येथे ह्युलेट-पॅकार्ड, स्पेस सिस्टम्स, व्हीएमवेर, टेसला मोटर्स, फोर्ड संशोधन केन्द्र, झेरॉक्स पार्क, स्काइप आणि इतर अनेक उच्चतंत्रज्ञानाशी निगडीत कंपन्यांची मुख्यालये आहेत.
२०१० च्या जनगणनेनुसार पालो आल्टोची लोकसंख्या ६४,४०३ असून येथे राहणारे अमेरिकेतील सगळ्यात उच्चशिक्षित असून हे शहर देशातील सगळ्यात महागड्या शहरांपैकी एक आहे. हे शहर बे एरियाचा एक भाग आहे.