पार्श्वनाथ आळतेकर
पार्श्वनाथ अनंत आळतेकर (१४ सप्टेंबर, इ.स. १८९८ - २२ नोव्हेंबर, इ.स. १९५९) हे मराठी नाट्य-चित्र अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, नाट्यसंस्था स्थापक आणि चालक होते.
आळतेकरांचे बालपण आणि मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कोल्हापुरात झाले. त्यांचे काका त्यांना कोल्हापुरात होणाऱ्या प्रत्येक नाटकाला घेऊन जात, त्यामुळे पार्श्वनाथानांही नाटकाचे वेड लागले, आणि ते त्यांनी आयुष्यभर जपून ठेवले. कॉलेजात असताना ’हाच मुलाचा बाप’ या नाटकातील नायकाच्या भूमिकेसह आळतेकरांनी गडकऱ्यांच्या एकच प्याला, पुण्यप्रभाव, प्रेमसंन्यास या नाटकांचे दिग्दर्शनही केले.
पुढे कायद्याच्या शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर पार्ष्वनाथ आळतेकरांना चरितार्थासाठी ’मॅजेस्टिक फिल्म कंपनी’त नोकरी सुरू केली. तिथेच त्यांनी पृथ्वीवल्लभ आदी सिनेमांतून भूमिका केल्या. वासवदत्ता आदी हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शनांखेरीज एका कानडी आणि दोन तामिळ चित्रपटांचेही दिग्दर्शन केले.
उडती पाखरे आदी नाटके नव्या तंत्राने रंगभूमीवर आणून रंगभूमीला प्रशिक्षित दिशा देण्याचा प्रयत्न पार्श्वनाथ आळतेकरांनी केला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर रंगभूमीला राजाश्रय मिळा्वा म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. रंगभूमीचा वनवास संपला पाहिजे आणि नाट्यकलेचा जीवनासाठी उपयोग झाला पाहिजे, असे ते सतत म्हणत, आणि त्या दृष्टीने त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.
संस्था स्थापना
नाट्यकलेचे पद्धतशीर आणि शास्त्रशुद्ध शिक्षण देऊन नट, नटी आणि दिग्दर्शक तयार होणे रंगभूमीच्या विकासाठी आवश्यक असल्याचे जाणून पार्ष्वनाथ आळतेकरांनी पुण्यात १९३८ साली ’नॅशनल थिएटर ॲकॅडमी’ स्थापन केली. एका वर्षाने ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी मुंबईत तशीच दुसरी संस्था स्थापली. याच काळात आळतेकर स्व्तःला ’रेजिसोर’ म्हणू लागले. ’रेजिसोर’ म्हणजे नाट्य दिग्दर्शन, नाट्य निर्मिती, नाट्य शिक्षण यांसारखी विविध नाट्यविषयक कामे करणारा माणूस.
पार्श्वनाथ आळतेकरांचा अभिनय असलेली नाटके (कंसात पात्राचे नाव)
- अपूर्व बंगाल
- आंधळ्याची शाळा (मंत्री अण्णासाहेब)
- उडती पाखरे
- कांचनगडची मोहना (खलनायक पिलाजीराव)
- खरा ब्राह्मण (विठू महार)
- तक्षशिला (अरुणदेव)
- पतंगाची दोरी
- बेबी (दामले)
- भाऊबंदकी (रामशास्त्री)
- माझ्या कलेसाठी
- रंभा
- राजसंन्यास (संभाजी)
- लपंडाव (बाबासाहेब)
- लिलाव
- सदा बंदिवान
- सारस्वत
- हाच मुलाचा बाप (डॉ. गुलाब)
दिग्दर्शित केलेली नाटके
- खरा ब्राह्मण
- पतंगाची दोरी
- पांचाली
- बेबी
- स्वस्तिक बॅन्ड
निर्मिती असलेली नाटके
- उडती पाखरे
- माझ्या कलेसाठी सदा बंदिवान
- सारस्वत
स्थापन केलेल्या संस्था
- नॅशनल कला अकादमी==
- सर्वोदय कला मंदिर
भूमिका केलेले चित्रपट
- चंद्रराव मोरे
- न्याय
- पृथ्वीवल्लभ
- प्रभावती
- महाराची पोर
- मुळराज सोळंखी
- वंदे मातरम्
- सौराष्ट्र वीर
दिग्दर्शित केलेल चित्रपट
- गीता
- वासवदत्ता
- सुखाचा शोध
- सौंगडी
सन्मान
पार्श्वनाथ आळतेकरांनी मराठी रंगभूमीसाठी केलेली चौफेर कामगिरी विचारात घेऊन त्यांना सोलापूर येथे १९५७ साली भरलेल्या ३९व्या मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष करण्यात आले.