पार्ले टिळक विद्यालय
पार्ले टिळक विद्यालय मुंबईच्या विलेपार्ले या उपनगरातील शाळा आहे. याची स्थापना इ.स. १९२१मध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या निधनानंतर पार्ल्यातील नागरिकांनी एकत्र येऊन केली. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन या संस्थेच्या विद्यमाने मराठी माध्यमाची तसेच इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते.