Jump to content

पार्थेनॉन

पार्थेनॉन

पार्थेनॉन (प्राचीन ग्रीक: Παρθενών) हे अथेन्सच्या अ‍ॅक्रोपोलिसवरील अथेना ह्या ग्रीक देवीचे एक मंदिर आहे. पार्थेनॉनचे बांधकाम इ.स.पू. ४४७ साली सुरू झाले व इ.स.पू. ४३२ साली हे मंदिर बांधून पूर्ण करण्यात आले. पार्थेनॉन ही आजवर टिकलेली प्रागैतिहासिक ग्रीक साम्राज्यामधील सर्वात महत्त्वाची इमारत आहे.

तत्कालीन ग्रीसमधील इतर मंदिरांप्रमाणे पार्थेनॉनचा वापर देखील तिजोरी ठेवण्यासाठी होत असे. पाचव्या शतकामध्ये ह्या मंदिराचे रूपांतर एका ख्रिश्चन चर्चमध्ये करण्यात आले तर १५ व्या शतकादरम्यान ओस्मानी साम्राज्याने पार्थेनॉनचा मशीद म्हणून वापर केला. त्या काळात पार्थेनॉनवर एक मिनार देखील बांधण्यात आला होता. २६ सप्टेंबर १६८७ रोजी एका लढाईदरम्यान पार्थेनॉनचा मोठा भाग उध्वस्त झाला.

गॅलरी

बाह्य दुवे