पारितोषिक
खेळ, स्पर्धा, परिक्षा यासारख्या स्पर्धात्मक गोष्टींमध्ये प्राविण्य, चांगली कामगिरी अथवा वरियता प्राप्त करणाऱ्यास सहसा पारितोषिक देण्यात येते.हे एक प्रकारचे बक्षिसच असते. पारितोषिक मिळावे म्हणून स्पर्धक जास्तीत जास्त व उत्तम सादरीकरणाचा व कामगिरी देण्याचा प्रयत्न करतात. पारितोषिक अनेक वेळा स्पर्धक नसतांनाही देण्यात येते.पारितोषिक देण्याचे प्रयोजन हे इतरांना तसे काम करण्यास उत्तेजित करणे असेही असते.