Jump to content

पारशी

पारशी हा एक संप्रदाय आहे. पारशी लोक दहाव्या शतकात पर्शियामधील इस्लामी राज्यवटीकडून सुरू असलेल्या छळापासून सुटका करण्यासाठी स्थानांतर करून भारतात (मुख्यतः गुजरातमध्ये) स्थायिक झाले.

भारताच्या इतिहासात अनेक पारशी लोकांना विशेष स्थान आहे. व्यापार ही पारशी लोकांची अंगभूत कला असल्यामुळे आजवर भारतात अनेक यशस्वी पारशी उद्योगपती होऊन गेले. भारतीय जनगणनेनुसार पारशी लोकांची संख्या सातत्याने घटत चालली आहे. सध्या जगात केवळ १ लाख पारशी अस्तित्वात आहेत.

महात्मा गांधी पारशी लोकांविषयी म्हणाले होते की हा समाज भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फक्त ०.००७% आहे पण त्यांची कामगिरी मात्र उल्लेखनीय आहे. स्वातंत्र सैनिकांपासून ते उद्योजकांपर्यंत पारश्यांचेही येगदान आहे.

आहार आणि खाद्य संस्कृती

पारशी लोकांचे जेवण हे गुजराती आणि इराणी खाद्यसंस्कृतींवर आधारित आहे.[] यात मुख्यत्वे भात आणि दालचा (घट्ट वरण) सामावेश आहे. बहुतांश पारशी लोक मांसाहार देखील करतात. पात्रानू मच्छी, धनसाक, चिकन फर्चा, सली कोंबडी हे काही पारशी मांसाहारी पदार्थ आहेत. अंडी आणि स्क्रॅंबल्ड एग, पारसी आकूरी, पोरो सारखे अंड्याचे पदार्थ हे पारशी नाश्त्यात असतात.[]

उल्लेखनीय पारशी व्यक्ती

नरिमन पॉईंटसह मुंबईमधील अनेक स्थळांची नावे पारशी व्यक्तींवरून ठेवण्यात आलेली आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  1. ^ Mavalvala, Niloufer (2016-07-29). The Art of Parsi Cooking: Reviving an Ancient Cuisine (इंग्रजी भाषेत). Austin Macauley Publishers Limited. ISBN 978-1-78629-042-7.
  2. ^ Kapadia, Rita (2014-06-18). Parsi Cuisine (इंग्रजी भाषेत). Createspace Independent Pub. ISBN 978-1-4997-3028-9.