पारजांब
पारजांब किंवा करंबा ऑलिव वंशातील सदापर्णी वृक्ष असून सदाहरित वनामध्ये हा वृक्ष आढळतो. मुख्यत: पच्छिमघाटामध्ये याचे स्थान आहे. भारतासहित बांग्लादेश व म्यानमार या देशात या वृक्षाचे अस्तित्व जाणवते. या झाडाची उंची १५ मीटर पर्यंत असू शकते. याची पाने काळसर हिरवी रंगाची, आकाराने दीर्घवृत्ताकृती व दातेरी असतात. याची फुले लहान व रंगाने पांढरी असतात तर फळे आकाराने वाटण्याच्या आकाराची आठळीयुक्त व रंगाने काळसर जांभळी असतात. [१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ "Olea dioica - Rose Sandalwood". www.flowersofindia.net. 2019-03-13 रोजी पाहिले.