पायपेटी
पायपेटी पायाने वाजवावयाचे पेटीसदृश वाद्य आहे. पेटीमध्ये एक हात कायम गुंतलेला असतो. पेटीत हाताने वाजवावयाचा जो भाता असतो, तो यामध्ये पायात असतो. पेटीतली हवा आत-बाहेर करणारा भाता हा दोरीच्या साहाय्याने पायातल्या पट्टीशी जोडलेला असतो. यामुळे पायपेटी खूर्चीवर बसूनच वाजवावी लागते.
पेटीतले सात स्वर एका हाताच्या पाच बोटांनी वाजवायला लागतात. पायपेटी वाजविताना दोन्ही हात मोकळे राहतात. त्यामुळे वादकाला आणखी वेगवेगळे स्वर अधिक सुलभतेने काढता येतात. संगीत, नाटके तसेच तमाशाच्या बारीत पूर्वी या वाद्याचा हमखास वापर केला जायचा. भजन, कीर्तन तसेच हरिनाम सप्ताहातही या वाद्याचा वापर व्हायचा.