पामडेल (कॅलिफोर्निया)
हा लेख अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील पामडेल शहर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, पामडेल (निःसंदिग्धीकरण).
पामडेल अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील शहर आहे. लॉस एंजेलस काउंटीच्या उत्तर भागात असलेले हे शहर लॉस एंजेलस महानगराचा भाग समजले जाते. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या १,५२,७५० होती.
येथे विमान आणि अंतराळयानांशी संबंधित अनेक उद्योग आहेत. येथील कारखान्यांमध्ये बी-१ लान्सर, बी-२ स्पिरिट, एफ-११७, एफ-३५, एसआर-७१ यांसारख्या लढाऊ विमानांची तसेच एल-१०११ सह अनेक प्रवासी विमानांचे उत्पादन होते अथवा झाले आहे.