१२ जुलै, इ. स. १९६१ रोजी महाराष्ट्रातीलपानशेत धरण फुटून पुणे व परिसरात आलेल्या पुराचा आपत्प्रसंग पानशेत पूर म्हणून ओळखला जातो.
१२ जुलै, इ. स. १९६१ या दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी पानशेत धरण फुटले. बंड गार्डन पूल सोडून पुण्यातील तत्कालीन बाकी सर्व पूल पाण्याखाली गेले होते. मुठा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेल्या शनिवार पेठ, नारायण पेठ, कसबा पेठ आणि सोमवार पेठ इत्यादी भागांची पुष्कळ हानी झाली.
पार्श्वभूमी
इ.स. १९५० च्या दशकापर्यंत पुण्याचा पाणीपुरवठा पुण्यापासून १३ कि. मी. अंतरावर मुठा नदीवर बांधलेल्या खडकवासला धरणातून होत असे. वाढत्या वस्तीने खडकवासल्याचे पाणी विशेषतः उन्हाळ्यात कमी पडू लागल्याने, पुणे शहर तसेच शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून खडकवासल्याच्या पश्चिमेस पुण्यापासून ३८ कि.मी. अंतरावर मुठेची उपनदी असलेल्या अंबा नदीवर पानशेत येथे प्रशासनाने मातीचे धरण बांधायचे ठरवले. १० ऑक्टोबर १९५७ साली पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली.[१] पहिल्या टप्प्यात ६ टीएमसी, तर दुसऱ्या टप्प्यात ११ टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून, इ.स. १९६२ पर्यंत बांधून पुरे होणार होते. इ.स. १९५९-१९६० च्या सुमारास बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तेव्हा अद्ययावत तंत्रज्ञान वापरल्यास पानशेत धरण प्रस्तावित मुदतीच्या एक वर्ष अगोदरच पुरे होऊ शकेल, असा विश्वास वाटल्याने भारताच्या केंद्रशासकीय पातळीवर तसा निर्णयही घेण्यात आला.[२] बांधकामाच्या आराखड्यात पानशेत धरणाच्या एका बाजूस पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी एक सांडवा योजला होता व दुसरीकडे धरणाच्या पोटात नालाकृती बोगद्याच्या रूपात दरवाजा असलेले एक बहिर्द्वार योजण्यात आले होते. बहिर्द्वाराच्या आतल्या तोंडाशी असलेले लोखंडी दार हलवण्यासाठीची यंत्रसामग्री बसवलेला एक मनोरा व मनोऱ्यावर जाण्यासाठी बांधापासून एक पूल, अशी व्यवस्था आराखड्यात होती. परंतु यांतील बऱ्याच गोष्टी इ.स. १९६१ च्या जूनअखेरीसदेखील पूर्ण झाल्या नव्हत्या. बहिर्द्वार नलिकेच्या वरच्या भागातील माती पुरेशी दाबली नसल्यामुळे तो भाग कच्चा राहिला होता. बहिर्द्वार नलिकेच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवलेला होता. पूरपातळीनुसार हा दरवाजा वर-खाली करायची व्यवस्था झालेली नव्हती. जून महिन्यात भरपूर पाऊस झाल्यामुळे जूनअखेरीस सर्व कामे अर्धवट स्थितीत थांबवावी लागली. परंतु भरपूर पर्जन्यवृष्टीमुळे जलाशय मात्र भरू लागला होता.
राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय
उद्याने आणि प्राणी संग्रहालये
बंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क ·संभाजी पार्क· थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान
दवाखाने
आदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे ·अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे· औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, पुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन् एम् वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे ·रुबी हॉल क्लिनिक, पुणे· सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे ·सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे