Jump to content

पानगळ

संपूर्ण पानगळ झालेला वृक्ष.
पानगळ-झाडाची खाली पडलेली वाळलेली पाने.

पानगळ ही वृक्षांच्या जीवनामधली एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेल्या वृक्षाची पाने एखाद्या ठरावीक ऋतूमध्ये गळून जातात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते.भारतात याला पानगळ असे म्हणातात आणि या ऋतूला शिशिर ऋतू असे म्हणतात.

उपयोग

काही वनस्पतींना पानगळती झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली अशी झाडे पक्षी, कीटक वा काही सस्तन प्राण्यांकडून परागीभवन करून घेतात. पाने नसल्याने झाडांची फुले सहज दिसतात. पक्षी, कीटक फुलांकडे आकर्षित झाल्याने फुलांचे परागीकरण होते. पानगळ होणाऱ्या वनस्पतीचे उदाहरण : पळस, बहावा, गुलमोहर