पाथरी
?पाथरी महाराष्ट्र • भारत | |
टोपणनाव: parthapur | |
— तालुका — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | परभणी |
तहसील | पाथरी |
पंचायत समिती | पाथरी |
पार्श्वभूमी
भौगोलिक माहिती
पाथरी हा परभणी जिल्ह्यातील एक तालुका आहे.
पाथरी तालुक्याचे मुख्यालय पाथरी हे शहर असून तेथे नगरपालिका आहे.
लोकसंख्या विषयक माहिती
पाथरी हे गाव १९.२५ अंश उत्तर अक्षांश व ७६.४५ अंश पूर्व रेखावृत्तावर आहे. २०११ च्या जणगणनेनुसार पाथरी शहराची लोकसंख्या ३६८५३ असून त्यापैकी पुरुष १९०२५ व स्त्रिया १७८२८ आहेत. शहरातील जनतेपैकी ७८% साक्षर आहेत. अनुसूचित जातीची टक्केवारी १२% तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या एकाहून कमी टक्के आहे.
वाहतूक विषयक माहिती
पाथरी हे शहर राष्ट्रीय महामार्ग २२२ (कल्याण ते निर्मल)वर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्थानक मानवत रोड हे १७ किमी अंतरावर आहे. पाथरी हे शहर जिल्हा मुख्यालय परभणी पासून पश्चिमेला ४३ किमी अंतरावर आहे. आणि विभागीय मुख्यालय औरंगाबादपासून १५१ किमी.वर आहे. सर्वात जवळचा विमानतळ औरंगाबाद आणि नांदेड येथे आहे.
पाथरी तालुका
पाथरी तालुक्याच्या पूर्वेला मानवत, पश्चिमेला माजलगाव व उत्तरेला सेलू व परतूर हे तालुके आहेत. पाथरी तालुक्यात ७३ गावे आहेत.
तीर्थक्षेत्र , मंंदीरे
पाथरी शहरा मध्ये संत साईबाबा यांचा जन्म झाला असे साईबाबांचे भक्त समजतात. मात्र अजूनही विश्वासार्ह व सर्वमान्य असा पुरावा न मिळाल्याने हा वाद कायम आहे.