Jump to content

पाताल लोक (वेब मालिका)

पाताल लोक
दिग्दर्शन अविनाश अरूण आणि प्रोसित रॉय
निर्मितीअनुष्का शर्मा
कथातरुण तेजपाल यांच्या पुस्तकावर काहीअंशी आधारित
पटकथा सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुंजित चोप्रा
प्रमुख कलाकार
  • जयदीप अहलावत
  • गुल पनाग
  • नीरज काबी
  • स्वस्तिका मुखर्जी
  • इश्वाक सिंग
  • अभिषेक बॅनर्जी
संकलन संयुक्ता काझा
छाया
  • अविनाश अरूण
  • करनेश शर्मा
संगीत
  • नरेन चंद्रावकर
  • बेनेडिक्ट टेलर
  • देश भारत
    भाषाहिंदी
    प्रदर्शित १५ मे २०२०
    वितरक एमेझोन प्राइम व्हिडीओ
    पुरस्कार फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार


    पाताल लोक ही २०२०ची ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवरील एक हिंदी क्राइम- थ्रिलर वेब मालिका आहे. ही मालिका सुदीप शर्मा यांनी तयार केली, तसेच त्यांनी सागर हवेली, हार्दिक मेहता आणि गुंजित चोप्रा यांच्यासह कथा देखील लिहिली आहे. अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय यांनी याचे दिग्दर्शन केले. क्लीन स्लेट फिल्मझ् या बॅनरखाली अनुष्का शर्माने या मालिकेची निर्मिती केली होती. या मालिकेत जयदीप अहलावत, गुल पनाग, नीरज काबी, स्वस्तिका मुखर्जी, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

    तरुण तेजपाल यांच्या २०१० च्या द स्टोरी ऑफ माय अ‍ॅसेसिन्स या कादंबरीवर आधारित, ही मालिका एका निराश झालेल्या पोलिसाविषयी आहे जो हत्येचा प्रयत्न चुकल्याच्या केसमध्ये उतरतो.

    पाताल लोकचा प्रीमियर १५ मे २०२० रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर झाला. मालिकेचा नायक जयदीप अहलावत आणि इतर प्रमुख पात्र यांचा अभिनय, कथानक, लेखन आणि दिग्दर्शन यांचे खूप मोठ्या प्रमाणात कौतुक झाले. या मालिकेला समीक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ही मालिका द इंडियन एक्सप्रेसने २०२० च्या सर्वोत्कृष्ट १० भारतीय वेब सिरीजच्या यादीमध्ये समाविष्ट केली.[] व्हरायटी मॅगझिनने पाताल लोकला २०२० च्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय टीव्ही कार्यक्रमांंपैकी एक म्हणून सूचीबद्ध केले.[]

    पाताल लोकला पहिल्या फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्समध्ये आठ नामांकने मिळाली आणि यापैकी पाच पुरस्कार जिंकले - सर्वोत्कृष्ट अभिनेता (जयदीप अहलावत), सर्वोत्कृष्ट मालिका, सर्वोत्कृष्ट मूळ कथा, सर्वोत्कृष्ट पटकथा आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (अविनाश अरुण आणि प्रोसित रॉय).[] मे २०२० मध्ये निर्मात्यांनी जाहीर केले की दुसरा भाग तयार केला जाणार आहे.

    संदर्भ

    1. ^ "Top 10 Indian web series of 2020: Paatal Lok, Scam 1992, Special Ops and more". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2020-12-29. 2022-02-02 रोजी पाहिले.
    2. ^ "Year in Review: The Best International TV Series of 2020". Variety (इंग्रजी भाषेत). 2020-12-22. 2022-02-02 रोजी पाहिले.
    3. ^ "Filmfare OTT Awards 2020: Paatal Lok, The Family Man, Aarya win top honours; see full list-Entertainment News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2020-12-20. 2022-02-02 रोजी पाहिले.