पाणी साठवणीच्या पद्धती
जलस्रोतांची साठवण
पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला, ठराविक काळी पडणारया पावसाच्या पाण्याचे नियोजन करावे लागे. पिण्यासाठीचे पाणी ,वापरावयाचे पाणी व अन्य कारणासाठी लागणारे पाणी नेहमी उपलब्ध असावे यासाठी पूर्वीपासून अनेक प्रयत्न झालेले दिसतात.
सिंधू संस्कृतीच्या काळातील अनेक विहिरी संशोधकांना मिळाल्या आहेत.त्यांची रचना वैशिष्ट्यपूर्ण अशी आहे.विशिष्ट पद्धतीने उंचवट्यावर बांधलेल्या या विहिरी असत.त्यामुळे वरून खालच्या दिशांना असलेल्या शेतांना पाणी पुरवठा करणे सोपे होई.काही विहिरी उभ्या आकाराच्या,उंचीला जास्त पण परीघ कमी असलेल्या बांधत;ज्यामुळे पाण्याची पातळी पसरट न होता वरती चढत असे व पाणी वापरणे सोपे होई.भारतातील सर्वच प्रांतात वैशिष्ट्यपूर्ण विहीरी आढळतात. त्या विविध नावानी ओळखल्या जातात .
विहिरींची विविध नावे
- आड - मराठी
- कुंडी - राजस्थानी
- कोसीटो किंवा कोईटो - म्हणजे खोलोला कमी असलेली विहिर
- कोहर - खूप खोल असलेली विहिर
- बारव अथवा बावडी
- कहार- सार्वजनिक विहिर
- कुआ - हिंदी
- कुई - रोज दोन तीन घागरी पाणी देणारी छोटी विहिर
- पिचको किंवा पेजको - फक्त प्राण्यांसाठी बांधलेली विहिर
- द्रः,दह्ड,दैड - बांधकाम न केलेली कच्ची विहिर
- मुकी विहिर,भून्डकी विहिर- नदी काठावर खोदलेली
- झालर (राजस्थान मधील)- मुख्यत: स्नान संध्या,जप ताप,धार्मिक कारणासाठी बांधलेली
- सागर का कुआ - प्रचंड मोठं पाण्याचा साठा पोटात असलेली विहिर
- सीर का कुआ- याला जमिनीखालून एका स्रोतामधून पाणी पुरवठा असतो [१]
संदर्भ आणि नोंदी
- ^ मिश्र अनुपम(१९९५) राजस्थान की रजत बुंदे