Jump to content

पाणलोट विकास कार्यकम

महाराष्ट्रातील बहुतांश शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली (पर्जन्याधारित) म्हणजेच कोरडवाहू आहे. त्यामूळेच या शेतीला अनेक मर्यादा येतात. त्या दूर करण्यासाठी पाणलोट व जलसंवर्धन हा अतिशय चांगला पर्याय आहे मूल्यवान पाणी आणि त्याइतकीच अमूल्य असलेली माती असे पाणी व माती यांचे संवर्धन करतानाच पडीत जमिनीचा विकास व त्या माध्यमातून रोजगारांची संख्या वाढविणे, हा या योजनेचा हेतू आहे.ज्यामूळे कृषी उत्पादनात वाढ तर होईलच, शिवाय मौल्यवान असलेल्या भूसंपत्तीचे रक्षण व सुधारणा होईल. या उद्देशानेच राज्यात 2002 पासून महात्मा ज्योतिबा फुले जल - भूमी संधारण अभियानांतर्गत भुजलसंपत्ती संवर्धनाचा संकल्प करण्यात आला आहे.. या अभियानासाठी स्थानिक स्वयंसेवी संस्था तसेच ग्रामीण जनतेचा सहभाग घेण्यात येतो. त्यांच्या मदतीने गेल्या काही वर्षात पाणी अडवून ते जमिनीत मुरवण्यांसाठी पाझर/ गाव मलाव, माती/ सिमेंट नालाबांधासाठी गाळ काढणे, जलस्तोत्राची किरकोळ दुरुस्ती, वनराई बंधारे बांधणे, कोल्हापूरी बंधा-यांच्या दरवाज्यांची दुरुस्ती आदी प्रकरची कामे करण्यात येतात. योजनेची प्रमुख उद्दीष्टे - राज्यातील पर्जन्याधारित - कोरडवाहू शेतीची पाणलोट व जलसंवर्धनाच्या माध्यमातून सिंचन उपलब्धता वाढविणे, पडीत जमिनींचा विकास करणे, जलसाक्षरता चळवळ राबविणे, पाण्याचा योग्य वापर, पाण्याचे पुनर्भरण व पाणी वाचिवणा-या पीकपद्धतीचा अवलंब करणे, जमिनीची धूप नियंत्रण करण्यासाठी राज्यभर जनजागृतीच्या उद्देशाने लोकशिक्षण मोहिम, कार्यशाळा व प्रशिक्षण कार्यक्रम घेणे. विविध लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये पाणीवापर संस्थांची स्थापना करून पाणीवाटपाचे व्यवस्थापन संबंधित संस्थांकडे हस्तांतरित करणे, पिण्याच्या पाण्याचा गंभीर टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी पाण्याचे स्तोत्र पारंपारिक व अपारंरिक माध्यमातून बळकट करणे हा आहे