Jump to content

पाणदिवे

पाणदिवे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे ८०० आहे. चिरनेर जंगल सत्याग्रहतील (२५ सप्टेंबर १९३०) हुतात्मा परशुराम रामा पाटील यांचे हे जन्मगाव आहे. गावात हुतात्मा स्मारक आहे. गावातील अनेक जण वैद्यकीय, पत्रकारिता, शैक्षणिक, अभियंतासह अनेक क्षेत्रात अग्रेसर आहेत. आगरी समाजचे दिवंगत नेते गणेश लक्ष्मण पाटील (ग. ल. पाटील ) यांचे हे जन्मगाव आहे. गावाच्या पुर्व दिशेला आंब्याच्या बागा आहेत. पश्चिमेला अरबी समुद्रा>ची खाडी आहे.गावात दत्त मंदिर, हनुमान मंदिर, कनिफनाथ, मरीआई, विठ्ठल, राममंदिर आहेत. दत्त जयंतीला गावात जत्रा भरते. उरण हे तालुक्याचे ठिकाण आहे.