पाणटिवळा (पक्षी)
पाणटिवळा, आरा चाचू खग, घाटी टिवळा, (इंग्लिश:Blacktailed Godwit; हिंदी:गुदेरा, गुडेरा, गौरिया, जंगराल खग, बडा चाहा, मलगुझा) हा एक पक्षी आहे.
आकाराने तित्तिरापेक्षा मोठा असतो. बदामी उदी रंगाचा. त्यावर चित्रविचित्र रंगाचे ठिपके. जलचर पक्षी. लहान कोरल व कोरलचा भाऊबंदच. चोच बारीक, सरळ व किंचित वर वाकलेली. उडताना पांढऱ्या शेपटीचे काळे टोक दिसते. तसेच पंखांवर पांढरी पट्टी. उन्हाळ्यात डोके, मान आणि छाती गंजासारखे तांबडी. नर-मादी दिसायला सारखेच. घोळक्याने किंवा मोठ्या थव्याने आढळून येतात.
वितरण
ईशान्य भारत आणि पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, ब्रम्हदेश ह्या भागांत हिवाळी पाहुणे. मालदीव बेटांत भाटले पक्षी. भारत द्विपकल्पात दक्षिणेकडे त्यांचे प्रमाण कमीकमी होत जाते. पॅलिआर्क्टिक भागात वीण.
निवासस्थाने
समुद्रकिनारे, चिखलाणी, दलदली तसेच अनेकदा भातशेतीचा प्रदेश.
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चितमपल्ली