Jump to content

पाणघार

पाणघार
पाणघार

पाणघार (इंग्लिश: Marsh Harrier; हिंदी: कुतार, कुलेसिर, सफेद सिर; संस्कृत:कच्छपत्री; गुजराती: पट्टाई) हा एक पक्षी आहे.

ओळख

त्याच्या उदी-तपकिरी वर्णामुळे तो कित्येकदा घारीसारखा वाटतो.

नर:शेपटीवरचा भाग तपकिरी किंवा पांढरा व त्यात उदी रंगाचे मिश्रण असते.छातीपासून शेपटीखालचा रंग तांबूस ते गर्द तांबूस-तपकिरी असतो.त्यावर उदी रेषा असतात.

मादी:पाठीवरचा रंग उदी-तपकिरी.डोके आणि मान पिवळट.पोटाखालील भागावर उदी रेषा नसतात.

वितरण

हिवाळी पाहुणे.भारत,नेपाळ,श्रीलंका,अंदमान,मालदीव आणि लक्षद्वीप बेटे. एप्रिल ते जून या काळात पॅलिआर्क्टिक प्रदेशात वीण.

निवासस्थाने

दलदली आणि पाणी असलेली भातशेती तसेच माळराने.

संदर्भ

  • पक्षिकोश - मारुती चितमपल्ली