पाण म्हैस
म्हैस | ||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
मुऱ्हा जातीची पाण म्हैस | ||||||||||||||
शास्त्रीय वर्गीकरण | ||||||||||||||
| ||||||||||||||
शास्त्रीय नाव | ||||||||||||||
Bubalus bubalis Linnaeus, इ.स. १८२७ | ||||||||||||||
आढळप्रदेश | ||||||||||||||
इतर नावे | ||||||||||||||
Bos bubalis |
पाण म्हैस किंवा भारतीय म्हैस हा एक भारतीय म्हशीचा प्रकार आहे. हे दुधाळू जनावर आहे. नर म्हशीला रेडा म्हणतात. म्हैस हा प्राणी सर्वसाधारण काळ्या रंगाचा असतो. क्वचित, एखाद्या म्हशीच्या डोक्याचा थोडा भाग पांढरा असतो.[१]
भारतीय म्हैस किंवा पाण म्हैस आणि जंगली म्हैस हे भारतात आढळणारे दोन वेगवेगळे उपप्रकार आहेत. भारतीय म्हशीला इंग्रजीत Water Buffalo किंवा River Buffalo असे म्हणतात. आणि जंगली म्हशीला Wild Water Buffalo असे म्हणतात. जेव्हा अमेरिकेचा शोध लागला तेव्हा तेथील बायसन पशूस चुकीने बफेलो असे संबोधले गेले. आणि बायसनचे ते नाव कायम झालं. तद्नंतर आशिया खंडातील म्हशींना बफेलो पासून वेगळेपणा दाखवण्यासाठी तिच्या पाण्याविषयीच्या आवडीवरून वॉटर हा शब्द लावला गेला.[२] आफ्रिकन जंगली म्हैस भारतीय म्हशीसारखीच दिसते पण प्रत्यक्षात ती एका वेगळ्या जातीची (genus) आहे.
लहानग्या रेड्याला टोणगा म्हणतात. म्हशीच्या नर पिल्लाला पारडू आणि मादी पिल्लाला पारडी असे म्हणतात. मराठवाड्यात ग्रामीण भाषेत नर म्हशीला 'हल्ल्या' असे म्हणतात.
जाती
भारतात म्हशीच्या पुढील जाती आढळतात.[३]
अ. क्र. | प्रकार | इतर नावे | आढळस्थान | चित्र | अभिग्रहन क्रमांक |
---|---|---|---|---|---|
१ | भदावरी | उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश | INDIA_BUFFALO_2010_BHADAWARI_01003 | ||
२ | जाफराबादी | गुजरात | INDIA_BUFFALO_0400_JAFFARABADI_01006 | ||
३ | मराठवाडी | महाराष्ट्र | INDIA_BUFFALO_1100_ MARATHWADI _01009 | ||
४ | मेहसाणा | गुजरात | INDIA_BUFFALO_0400_MEHSANA_01004 | ||
५ | मुऱ्हा | हरियाणा | INDIA_BUFFALO_0500_MURRAH_01001 | ||
६ | नागपुरी | महाराष्ट्र | INDIA_BUFFALO_1100_NAGPURI_01007 | ||
७ | निली रावी | पंजाब | INDIA_BUFFALO_1600_NILIRAVI_01002 | ||
८ | पंढरपुरी | महाराष्ट्र | INDIA_BUFFALO_1100_PANDHARPURI_01008 | ||
९ | सुरती | गुजरात | INDIA_BUFFALO_0400_SURTI_01005 | ||
१० | तोडा | तामिळनाडू | INDIA_BUFFALO_0018_TODA_01010 | ||
११ | बन्नी | गुजरात | INDIA_BUFFALO_0400_BANNI_01011 | ||
१२ | चिलीका | ओडिशा | INDIA_BUFFALO_1500_CHILIKA_01012 | ||
१३ | कलहंडी | ओडिशा | INDIA_BUFFALO_1500_KALAHANDI_01013 | ||
१४ | लुइट | आसाम, मणिपुर | INDIA_BUFFALO_0212_LUIT_01014 | ||
१५ | बरगुर | तामिळनाडू | INDIA_BUFFALO_1800_BARGUR_01015 | ||
१६ | छत्तीसगढी | छत्तीसगढ | INDIA_BUFFALO_2600_CHHATTISGARHI_01016 | ||
१७ | गोजरी | पंजाब, हिमाचल प्रदेश | INDIA_BUFFALO_1606_GOJRI_01017 | ||
१८ | धारवाडी | कर्नाटक | INDIA_BUFFALO_0800_DHARWADI_01018 | ||
१९ | मांडा | ओडिशा | INDIA_BUFFALO_1500_MANDA_01019 | ||
२० | पूर्णाथडी | महाराष्ट्र | INDIA_BUFFALO_1100_PURNATHADI_01020 |
म्हशीना होणारे रोग
घटसर्फ, फऱ्या, काळपुळी, बुळकांड्या, लाळ खुरकुत, पोटफुगी.
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "महाराष्ट्र पशुधन विकास मंडळ" (PDF). 2022-06-18 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 2022-05-05 रोजी पाहिले.
- ^ "म्हैस". ३ मार्च २०२१ रोजी पाहिले.
- ^ "Registered Breeds Of Buffalo". nbagr.icar.gov.in (इंग्रजी भाषेत). ४ मार्च २०२४ रोजी पाहिले.