पाटल्या
साधारणतः,५ ते १० मिमीरुंद व सुमारे १/४ ते १/२ मिमीजाड सोन्याच्या पत्र्यापासून बनविलेली चापट बांगडी.परिधान करणाऱ्याचे मनगटाचे जाडीनुसार याची गोलाई करण्यात येते.याच्या बाह्य आवरणावर कलाकुसर असते.या शुद्ध सोन्यापासून बनविण्यात येतात. हा स्त्रीयांनी बांगडीसारखा हातात घालावयाचा अलंकार आहे.