पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५-८६
श्रीलंका क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा, १९८५-८६ याच्याशी गल्लत करू नका.
पाकिस्तान क्रिकेट संघाचा श्रीलंका दौरा, १९८५-८६ | |||||
श्रीलंका | पाकिस्तान | ||||
तारीख | २३ फेब्रुवारी – २७ मार्च १९८६ | ||||
संघनायक | दुलिप मेंडीस | इम्रान खान | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ४-सामन्यांची मालिका २–० जिंकली |
पाकिस्तान क्रिकेट संघाने फेब्रुवारी ते मार्च १९८६ दरम्यान तीन कसोटी सामने आणि चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी श्रीलंकेचा दौरा केला. पाकिस्तानचा हा श्रीलंकेचा पहिला दौरा होता. कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली तर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-० ने जिंकली.
कसोटी मालिका
१ली कसोटी
२३-२७ फेब्रुवारी १९८६ धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- पाकिस्तानने श्रीलंकेत पहिल्यांदाच कसोटी खेळली.
- जयनंदा वर्णवीरा (श्री) आणि झल्कारनैन (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
२री कसोटी
१४-१८ मार्च १९८६ धावफलक |
पाकिस्तान | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- कसोटीमध्ये श्रीलंकेने पाकिस्तानला प्रथमच पराभूत केले.
- डॉन अनुरासिरी, कोसला कुरुप्पुअराच्ची आणि रोशन महानामा (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
३री कसोटी
२२-२७ मार्च १९८६ धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- कौशिक अमालियान (श्री) आणि झाकिर खान (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
२ मार्च १९८६ धावफलक |
श्रीलंका १२४/६ (२३ षटके) | वि | पाकिस्तान १२५/२ (२१.३ षटके) |
किर्ती रणसिंगे ४१ (४९) अब्दुल कादिर ३/२३ (५ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी २३ षटकांचा करण्यात आला.
- श्रीलंकेत पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- डॉन अनुरासिरी, ॲशली डि सिल्वा, रोशन महानामा, गामिनी परेरा आणि किर्ती रणसिंगे (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
८ मार्च १९८६ धावफलक |
पाकिस्तान १२५/८ (३८ षटके) | वि | श्रीलंका |
- नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला. परंतु पुन्हा पाऊस आल्याने उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
- कौशिक अमालियान आणि चंपक रमानायके (श्री) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
३रा सामना
९ मार्च १९८६ धावफलक |
श्रीलंका | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक : नाणेफेक नाही
- ४५ षटकांचा सामना.
- पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
४था सामना
११ मार्च १९८६ धावफलक |
श्रीलंका १६०/८ (३८ षटके) | वि | पाकिस्तान १०३/४ (२३ षटके) |
अर्जुन रणतुंगा ७४ (८९) वसिम अक्रम ४/२८ (९ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
- ४५ षटकांचा सामना.
- खराब वातावरणामुळे सामना प्रत्येकी ३८ षटकांचा करण्यात आला.