पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२
पाकिस्तान क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२१-२२ | |||||
बांगलादेश | पाकिस्तान | ||||
तारीख | १९ नोव्हेंबर – ८ डिसेंबर २०२१ | ||||
संघनायक | महमुद्दुला (ट्वेंटी२०) मोमिनुल हक (कसोटी) | बाबर आझम | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | लिटन दास (२२४) | आबिद अली (२६३) | |||
सर्वाधिक बळी | तैजुल इस्लाम (१०) | साजिद खान (१६) | |||
मालिकावीर | आबिद अली (पाकिस्तान) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अफीफ हुसैन (७६) | फखर झमान (९१) | |||
सर्वाधिक बळी | महमुद्दुला (३) | मोहम्मद वसिम (५) | |||
मालिकावीर | मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने नोव्हेंबर - डिसेंबर २०२१ दरम्यान दोन कसोटी सामने आणि तीन आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला. कसोटी मालिका २०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धे अंतर्गत खेळवली गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दौऱ्याचे वेळापत्रक जारी केले. पाकिस्तानने एप्रिल-मे २०१५ नंतर प्रथमच बांगलादेशचा दौरा केला.
तिन्ही सामने जिंकत पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिकेत ३-० अश्या फरकाने विजय मिळवला. तसेच दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानने विजय मिळवत कसोटी मालिका २-० ने जिंकली.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका
१ला सामना
बांगलादेश १२७/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १३२/६ (१९.२ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- सैफ हसन (बां) याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२रा सामना
बांगलादेश १०८/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १०९/२ (१८.१ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
३रा सामना
बांगलादेश १२४/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १२७/५ (२० षटके) |
मोहम्मद नयीम ४७ (५०) मोहम्मद वसिम २/१५ (४ षटके) |
- नाणेफेक : बांगलादेश, फलंदाजी.
- शोहिदुल इस्लाम (बां) आणि शाहनवाझ दहानी (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण केले.
२०२१-२३ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा - कसोटी मालिका
१ली कसोटी
बांगलादेश | वि | पाकिस्तान |
- नाणेफेक: बांगलादेश, फलंदाजी.
- यासिर अली (बां) आणि अब्दुल्ला शफिक (पाक) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : पाकिस्तान - १२, बांगलादेश - ०.
२री कसोटी
पाकिस्तान | वि | बांगलादेश |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- महमुदुल हसन जॉय (बां) याने कसोटी पदार्पण केले.
- कसोटी अजिंक्यपद स्पर्धा गुण : पाकिस्तान - १२, बांगलादेश - ०.