पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२
पाकिस्तान क्रिकेट संघाचा नेदरलँड्स दौरा, २०२२ | |||||
नेदरलँड्स | पाकिस्तान | ||||
तारीख | १६ – २१ ऑगस्ट २०२२ | ||||
संघनायक | स्कॉट एडवर्ड्स | बाबर आझम | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | टॉम कूपर (१९३) | बाबर आझम (२२२) | |||
सर्वाधिक बळी | बास डि लीड (५) व्हिव्हियन किंग्मा (५) | नसीम शाह (१०) |
पाकिस्तान क्रिकेट संघाने तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळण्यासाठी ऑगस्ट २०२२ मध्ये नेदरलँड्सचा दौरा केला. एकदिवसीय मालिका २०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग अंतर्गत खेळवली गेली. मूलत: सदर सामने मे २०२१ मध्ये नियोजीत होते. परंतु कोव्हिड-१९मुळे मालिका पुढे ढकलण्यात आली. सर्व सामने रॉटरडॅम शहरातील हझेलारवेग स्टेडियम या मैदानावर झाले. ही पहिलीच अशी वेळ होती जेव्हा पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी नेदरलँड्सचा दौरा केला.
पाकिस्तानने तीनही सामन्यात विजय मिळवत वनडे मालिका ३-० ने जिंकली.
२०२०-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीग - आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान ३१४/६ (५० षटके) | वि | नेदरलँड्स २९८/८ (५० षटके) |
फखर झमान १०९ (१०९) बास डि लीड २/४२ (१० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- आघा सलमान आणि नसीम शाह (पाक) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.
२रा सामना
नेदरलँड्स १८६ (४४.१ षटके) | वि | पाकिस्तान १९१/३ (३३.४ षटके) |
बास डि लीड ८९ (१२०) हॅरीस रौफ ३/१६ (७.१ षटके) |
- नाणेफेक : नेदरलँड्स, फलंदाजी.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.
३रा सामना
पाकिस्तान २०६ (४९.४ षटके) | वि | नेदरलँड्स १९७ (४९.२ षटके) |
बाबर आझम ९१ (१२५) बास डि लीड ३/५० (९ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
- अब्दुल्ला शफिक (पाक) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- विश्वचषक सुपर लीग गुण : पाकिस्तान - १०, नेदरलँड्स - ०.