पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड आणि आयर्लंड दौरा, २०१६
पाकिस्तान क्रिकेट संघाने ३ जुलै ते ७ सप्टेंबर २०१६ दरम्यान इंग्लंड आणि आयर्लंड दौरा केला. या दौऱ्यावर इंग्लंडविरूद्ध ४-कसोटी, ५-एकदिवसीय आणि १-टी२० सामन्यांची मालिका खेळवली गेली.[१] त्याशिवाय कसोटी मालिकेआधी सॉमरसेट आणि ससेक्सविरूद्ध ३-दिवसीय कसोटी आणि वूस्टरशायरविरूद्ध २-दिवसीय सामने खेळवले गेले. तसेच एकदिवसीय मालिकेआधी आयर्लंडविरूद्ध २-एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली गेली.[२][३]
इंग्लंडच्या पाकिस्तानविरूद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पहिल्यांदाच मैदानावरील पंचांऐवजी टीव्ही पंचांच्या मदतीने पुढच्या पावलाचा नो-बॉल ठरवण्याच्या पद्धतीची चाचणी घेण्यात आली. [४] तिसऱ्या एकदिवसीया सामन्यात, इंग्लंडने ४४४ धावा करून एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा नवीन विक्रम प्रस्थापित केला. ॲलेक्स हेल्सने १७१ धावा करून इंग्लिश फलंदाजातर्फे सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम मोडला.[५]
कसोटी मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. इंग्लंडने एकदिवसीय मालिकेत ४-१ असा विजय मिळवला आणि एकमेव टी२० सामना पाकिस्तानने ९ गडी राखून जिंकला. ह्या सामन्यांसाठी मे २०१६ मधील श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेत सुरू झालेली गुण-पद्धत वापरली गेली.[६] इंग्लंडने सुपर सिरिज १६-१२ अशी जिंकली.
इंग्लंड
पाकिस्तान क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २०१६ | |||||
इंग्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | ३ जुलै – ७ सप्टेंबर २०१६ | ||||
संघनायक | अलास्टेर कुक (कसोटी) | मिसबाह-उल-हक (कसोटी) अझहर अली (ए.दि.) | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ४-सामन्यांची मालिका बरोबरीत २–२ | ||||
सर्वाधिक धावा | ज्यो रूट (५१२) | युनिस खान (१९) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस वोक्स (२६) | यासिर शाह (१९) | |||
मालिकावीर | ख्रिस वोक्स (इं) आणि मिसबाह-उल-हक (पा) | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ज्यो रूट (२७४) | सरफराज अहमद (३००) | |||
सर्वाधिक बळी | ख्रिस वोक्स (९) | हसन अली (८) | |||
मालिकावीर | ज्यो रूट (इं) | ||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ॲलेक्स हेल्स (३७) | खालिद लतीफ (५९) | |||
सर्वाधिक बळी | आदिल रशीद (१) | वहाब रियाझ (३) | |||
सुपर सिरीज गुण | |||||
इंग्लंड १६, पाकिस्तान १२ |
संघ
दौरा सामने
प्रथम श्रेणी: सॉमरसेट वि पाकिस्तानी
३-५ जुलै धावफलक |
वि | पाकिस्तान | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी
- प्रथम श्रेणी पदार्पण: डॉमनिक बेस आणि ॲडम होज (सॉमरसेट)
प्रथम श्रेणी: ससेक्स वि पाकिस्तानी
८-१० जुलै धावफलक |
पाकिस्तान | वि | |
२९१/५घो (६३.५ षटके) हॅरी फिंच १०३ (१४०) इम्रान खान २/६० (१३ षटके) | ||
- नाणेफेक: ससेक्स, गोलंदाजी
- पावसामुळे ३ऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
- प्रथम श्रेणी पदार्पण: जोफ्रा आर्चर आणि फिलीप सॉल्ट (ससेक्स)
२-दिवसीयः वूस्टरशायर वि पाकिस्तानी
कसोटी मालिका
१ली कसोटी
पाकिस्तान | वि | |
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: जेक बॉल (इं)
- कसोटी क्रिकेटमध्ये शतक करणारा मिसबाह-उल-हक (पा) हा वयाने सर्वात मोठा कर्णधार.[१३]
- लॉर्डस् वरील कसोटी सामन्यात १० बळी घेणारा यासिर शाह हा पहिलाच आशियाई क्रिकेट खेळाडू.[१४]
- स्टुअर्ट ब्रॉडचे (इं) ३५० कसोटी बळी पूर्ण.[१५]
- इंग्लंडविरूद्ध लॉर्डसवर पाकिस्तानचा हा २० वर्षांत पहिलाच विजय, तसेच त्यांचा एकूण चौथा विजय आणि कोणत्याही आशियाई संघातर्फे एक विक्रम.[१६][१७]
- आयसीसी गोलंदाजी कसोटी क्रमवारीत यासिर शाह पहिल्या स्थानावर पोहोचला.[१८]
- गुण: पाकिस्तान - ४, इंग्लंड - ०
२री कसोटी
वि | पाकिस्तान | |
१९८ (६३.४ षटके) मिसबाह-उल-हक ५२ (११४) ख्रिस वोक्स ४/६७ (१६ षटके) | ||
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- अलास्टेर कुकची (इं) कर्णधार म्हणून ५० वी कसोटी.
- गुण: इंग्लंड - ४, पाकिस्तान - ०
३री कसोटी
वि | पाकिस्तान | |
४०० (१३६ षटके) अझर अली १३९ (२९३) ख्रिस वोग्स ३/७९ (३० षटके) | ||
- नाणेफेक: पाकिस्तान, फलंदाजी.
- इंग्लंडची मायदेशातील ५००वी कसोटी.
- गुण: इंग्लंड - ४, पाकिस्तान - ०.
४थी कसोटी
वि | पाकिस्तान | |
५४२ (१४६ षटके) युनिस खान २१८ (३०८) ख्रिस वोक्स ३/८२ (३० षटके) | ||
४२/० (१३.१ षटके) अझहर अली ३०* (२८) |
- नाणेफेक: इंग्लंड, फलंदाजी.
- कसोटी पदार्पण: इफ्तिखार अहमद (पा)
- वहाब रियाझचे (पा) ५० कसोटी बळी पूर्ण.
- ज्यो रूटच्या (द) ४,००० कसोटी धावा पूर्ण.
- गुण: पाकिस्तान - ४, इंग्लंड - ०.
एकदिवसीय मालिका
१ला सामना
पाकिस्तान २६०/६ (५० षटके) | वि | इंग्लंड १९४/३ (३४.३ षटके) |
अझर अली ८२ (११०) ज्यो रूट १/२६ (४ षटके) | जासन रॉय ६५ (५६) मोहम्मद नवाझ १/३१ (६.३ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- इंग्लंडच्या डावा दरम्यान ३४ षटकांनंतर सामना थांबवण्यात आला आणि इंग्लंड समोर विजयासाठी ४८ षटकांमध्ये २५२ धावांचे नवे लक्ष्य ठेवण्यात आले.
- त्यानंतर ३४.३ षटकांनंतर पुन्हा आलेल्या पावसामुळे पुढील खेळ होऊ शकला नाही. त्यावेळी इंग्लंडने १५० धावा करणे गरजेचे होते.
- गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०
२रा सामना
पाकिस्तान २५१ (४९.५ षटके) | वि | इंग्लंड २५५/६ (४७.३ षटके) |
सरफराज अहमद १०५ (१३०) ख्रिस वोक्स ३/४२ (९.५ षटके) | ज्यो रूट ८९ (१०८) इमाद वसिम २/३८ (७ षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- पाकिस्तानतर्फे लॉर्डस् वर एकदिवसीय सामन्यात शतक करणारा सरफराज अहमद हा पहिलाच फंलदाज.
- गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०
३रा सामना
इंग्लंड ४४४/३ (५० षटके) | वि | पाकिस्तान (षटके) |
मोहम्मद अली ५८ (२८) ख्रिस वोक्स ४/४१ (५.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- इंग्लंडचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विश्वविक्रम.
- ॲलेक्स हेल्सचा इंग्लंडतर्फे एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावांचा विक्रम.
- जोस बटलरचा इंग्लंडतर्फे सर्वात जलद ५० धावांचा विक्रम.
- वहाब रियाजचे गोलंदाजी पृथ्थकरण ०/११० हे एकदिवसीय क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात खराब प्रदर्शन.
- गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०
४था सामना
पाकिस्तान २४७/८ (५० षटके) | वि | इंग्लंड २५२/६ (४८ षटके) |
अझर अली ८० (१०४) आदिल रशीद ३/४७ (१० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी
- आयॉन मॉर्गनच्या ५,००० एकदिवसीय धावा पूर्ण
- ज्यो रूटच्या ३,००० एकदिवसीय धावा पूर्ण
- गुण: इंग्लंड - २, पाकिस्तान - ०
५वा सामना
इंग्लंड ३०२/४ (५० षटके) | वि | पाकिस्तान ३०४/६ (४८.२ षटके) |
जासन रॉय ८७ (८९) हसन अली ४/६० (१० षटके) |
- नाणेफेक : पाकिस्तान, गोलंदाजी
- एकदिवसीय पदार्पण: लियाम डॉसन (इं)
- गुण: पाकिस्तान - २, इंग्लंड - ०
टी२० मालिका
एकमेव टी२०
इंग्लंड १३५/७ (२० षटके) | वि | पाकिस्तान १३९/१ (१४.५ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण: बाबर आझम आणि हसन अली (पा).
- सरफराज अहमदचा पाकिस्तानचा कर्णधार म्हणून पहिलाच टी२० सामना.
- गुण: पाकिस्तान - २, इंग्लंड - ०.
आयर्लंड
पाकिस्तान क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१६ | |||||
आयर्लंड | पाकिस्तान | ||||
तारीख | १८ – २० ऑगस्ट २०१६ | ||||
संघनायक | विल्यम पोर्टरफिल्ड | अझर अली | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | पाकिस्तान संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | गॅरी विल्सन (२१) | शर्जील खान (१५२) | |||
सर्वाधिक बळी | बॅरी मॅककॅर्थी (४) | इमाद वसिम (५) | |||
मालिकावीर | शर्जील खान (पा) |
संघ
एकदिवसीय | |
---|---|
आयर्लंड | पाकिस्तान |
|
|
एकदिवसीय मालिका
१ला सामना
आयर्लंड ३३७/६ (४७ षटके) | वि | पाकिस्तान ८२ (२३.४ षटके) |
शर्जील खान १५२ (८६) बॅरी मॅककॅर्थी ४/६२ (१० षटके) | गॅरी विल्सन २१ (३३) इमाद वसिम ५/१४ (५.४ षटके) |
- नाणेफेक : आयर्लंड, गोलंदाजी.
- ओल्या मैदानामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
- एकदिवसीय पदार्पण: हसन अली आणि मोहम्मद नवाझ (पा).
- शर्जील खानचे (पा) पहिले एकदिवसीय शतक.
- पाकिस्तानचा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वात मोठा धावांचा विजय.
- आयर्लंडची मायदेशामधील सर्वात निचांकी आणि एकदिवसीय क्रिकेट मधील दुसरी सर्वात निचांकी धावसंख्या .
२रा सामना
संदर्भ आणि नोंदी
- ^ "पाकिस्तानच्या इंग्लंड दौर्याचे वेळापत्रक" (इंग्रजी भाषेत). ७ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इसीबीतर्फे २०१६ आंतरराष्ट्रीय उन्हाळी मोसमाच्या तारखा जाहीर". इसीबी.सीओ.युके (इंग्रजी भाषेत). २५ ऑगस्ट २०१५ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान वि. इंग्लंड वेळापत्रक २०१६" (इंग्रजी भाषेत). ८ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड-पाकिस्तानच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये पुढच्या पावलाचा नो-बॉल टीव्ही पंच ठरवणार" (इंग्रजी भाषेत). २० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "ट्रेंट ब्रिज येथे एकदिवसीय विक्रमी धावसंख्या" (इंग्रजी भाषेत). ३० ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "इंग्लंड वि श्रीलंका: 'सुपर सिरीज' मध्ये विविध प्रकारच्या क्रिकेटसाठी गुण दिले जाणार" (इंग्रजी भाषेत). १९ मे २०१६ रोजी पाहिले.
- ^ "बॉलन्स, रोलंड-जोन्सचा इंग्लंडच्या संघात समावेश" (इंग्रजी भाषेत).
- ^ "इंग्लंड दौर्यासाठी मोहम्मद आमिरची निवड" (इंग्रजी भाषेत).
- ^ "इंग्लंडच्या एकदिवसीय संघात वूड आणि स्टोक्स" (इंग्रजी भाषेत). १६ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तान एकदिसीय चमूमध्ये उमर गुलचे पुनरागमन" (इंग्रजी भाषेत). ९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "संपूर्ण ताकदीच्या टी२० संघात स्टोक्सची निवडम, डॉसन मालिकेला मुकणार" (इंग्रजी भाषेत). ३१ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.
- ^ "अमाद बटने पाकिस्तान टी२० संघात स्थान मिळवले" (इंग्रजी भाषेत). १ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.
- ^ सीर्वी, भरत. "कसोटी शतक करणारा सर्वात मोठा कर्णधार " (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ जयरामन, शिवा. "कुकने गावस्करला मागे टाकले" (इंग्रजी भाषेत). १६ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ गार्डनर, ॲलन. "राहतच्या तीन बळीमुंळे इंग्लंडची वाताहत" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "लॉर्डसवर २० वर्षांनंतर पाकिस्तानचा इंग्लंडवर विजय" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "पाकिस्तानची लॉर्डस् वरील दीर्घ प्रतिक्षा संपलीः त्यांचे याआधीचे तीन विजय" (इंग्रजी भाषेत). १७ जुलै २०१६ रोजी पाहिले.
- ^ "यासिर शाह गोलंदाजी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर" (इंग्रजी भाषेत). १८ जुलै २०१६ रोजी पाहिले.