पाक हंस
पाक हंस (इंग्लिश:mute swan) हा एक पक्षी आहे.
ओळख
आकाराने गिधाडापेक्षा मोठा असतो.पांढरा रंग व लांब मान,व नर-मादी दिसायला सारखे चोच पाण्यात घालून चरतात.चोचीच्या मुळाशी काळ्या रंगाची गुठळी असते.
वितरण
पाकिस्तान आणि भारताच्या वायव्यदिशेला हिवाळ्यात काही भटके पक्षी आढळून आले.महाराष्ट्रातील पुण्याजवळ एक भटका पक्षी दिसला.
निवासस्थाने
सरोवरे,तळी,नद्या आणि खाजणी
संदर्भ
- पक्षिकोश - मारुती चित्तमपल्ली