Jump to content

पांडे महाल (भंडारा)

पांडे महाल महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील एक वास्तू आहे. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी रायबहादूर यादवराव पांडे यांनी हा महाल बांधला होता. अठराव्या शतकात लॉर्ड हेस्टिंगच्या काळात सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी रामवहादूर यादवराव पांडे यांनी हा महाल बांधला होता. या महालाचे बांधकाम १८९६ मध्ये पूर्ण झाले. २०० हुन अधिक खोल्या असलेला हा महाल सुमारे ६० हजार वर्ग फूटमध्ये अबांधण्यात आयला आहे. या सर्व खोल्या व दिवाणखाने कलाकृतीने सजलेल्या आहे. या महालात नृत्य सभागृह तसेच पूजाघरही आहे. बेल्जियम काचेचे भव्य आरसे, झुंबर, इटालियन मार्बल टाईल्स, फवारे, सुंदर नक्षीकाम व भव्य आकर्षक बांधणी यामुळे पांडे महाल भंडाऱ्याचे भुषण आहे. आज मात्र या महालाची अवस्था अतिशय दयनीय आहे. महालाची स्थिती जीर्णावस्थेत पोहोचल्याने पांडे कुटुंबिय महाल सोडून नागपूर येथे स्थापिक झाले आहेत. दुर्लक्षामुळे महाताची स्थिती नाजूक झाली असून जागोजागी प्लॉस्टर निघालेले आहे. लोखंडी बीम पावसामुळे नष्ट होऊन काही भाग तुटून खाली पडलेला आहे. वरचा मजला नाजूक अवस्थेत असल्याने तो कधीही जमीनदोस्त होऊ शकतो. मुख्य दरवाजाने आत प्रवेश केल्यावर समोरच एका दालनात यादवराव पांडे यांचा संगमरवरी पुतळा आहे. संपुर्ण महाल फिरणे धोकादायक असल्याने केवळ पाच ठिकाणाहुन महाल पहाता येतो. याशिवाय सोबतच देवघरच्या भागात असलेल्या छपरीतील ऐतिहासिक वस्तू पहाता येतात. पुरातत्व विभागाने महालाचे सर्व्हेक्षण करून घेतले असुन सर्वेक्षणानंतर पुरातत्व विभागाने या महालला पुरातन वास्तू (हेरिटेज बिल्डिंग) म्हणून घोषित केले आहे. यादवराव पांडे इंग्रजांच्या काळात भंडारा सुभ्याचे मानद कमिश्नर होते. ७७ गावांची मालकी त्यांच्याकडे होती. नागपूरकर भोसल्यांचे ते सावकार होते. १८९८ मध्ये इंग्रजांनी पोलीस कारवाईने या महालावर मालकी मिळवली होती परंतु १९०१ मध्ये पांडे महालाचे मालकी हक्क गणपतराव पांडे यांना सुपूर्द केले गेले. पांडे परिवारही आर्थिकदृष्ट्या खचलेला असुन खाजगी मालकी हक्कामुळे पुरातत्व खात्याचे येथे फारसे लक्ष नाही. वेळीच लक्ष न दिल्यास ही वास्तु येणाऱ्या काळात नष्ट होण्याची शक्यता आहे. पांडे महालात बसणारा गणपती भंडारा शहराचा गणपती मानला जातो.[] हा महाल सुमारे ६० हजार वर्ग फूटमध्ये असून हत्तीसुद्धा चालू शकतो.[] सतराव्या अठराव्या शतकाच्या लॉर्ड हेस्टिंगच्या काळात येथे 60 हजार चौरस फुटात या महालाचे बांधकाम करण्यात आले होते. पुरातत्त्व व पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले होते. परंतु, दिवंगत यादवराव पांडे यांचे वारस व शासनाच्या उदासीनतेमुळे या वास्तूला अवकळा आली आहे. नागपूरकर भोसल्यांचे सावकारभंडारा सुभ्याचे मानद कमिशनर असलेल्या यादवराव पांडे यांनी या महालाचे बांधकाम केले होते. १८९८ मध्ये इंग्रजांनी पोलिस कारवाई करून हा महाल ताब्यात घेतला. परंतु, १९०१ मध्ये या महालाची मालकी गणपतराव पांडे यांना सोपविण्यात आली.[]

छायाचित्र दालन

बाह्य दुवे

संदर्भ

  1. ^ a b "भंडाऱ्याच्या पांडे महालाची विक्री". Maharashtra Times. 2023-01-07 रोजी पाहिले.
  2. ^ "भंडाऱ्यातील प्रसिद्ध पांडे महाल अखेर विकला". eSakal - Marathi Newspaper. 2023-01-07 रोजी पाहिले.