पांगुळ
पांगुळ किंवा पिंगळा ही एक भटक्या भिक्षेकऱ्यांची जात आहे.[१] सूर्यदेवाचा शरीराने पांगळा असलेला सारथी 'अरुण' याचे प्रतिनिधी म्हणून हे पिंगळे ओळखले जातात. म्हणूनच ते अरुणोदयाच्या आधीच दारात येतात आणि 'धर्म जागो' अशी शुभकामना व्यक्त करून दान मागतात. कधीकधी हे पिंगळे पहाटेच्या वेळी एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर बसलेले दिसतात. तेथूनच ते येणाऱ्या जाणाऱ्यांकडून दान मागतात. खांद्यावर घोंगडी, धोतर, डोक्यावर रंगीबेरंगी चिंध्यांपासून बनवलेली टोपी व काखेला झोळी असा त्यांचा पोषाख असतो. त्यांच्या हातात घुंघराची काठी आणि कंदील असतो. महानुभावांच्या लीळाचरित्रात, तसेव नामदेव-ज्ञानदेवांच्या साहित्यात पिंगल्याचा उल्लेख आढळतात. हे 'पिंगळे' मुख्यत्वेकरून महाराष्ट्राच्या दक्षिणेकडील प्रदेशात आढळतात. त्यांच्या बायका गोधड्या शिवतात, घोंगड्या विणतात व त्या विकून, तसेच पिंगळ्यानी मागून आणलेल्या भिक्षेवर आणि दानावर त्यांची गुजराण चालते.
बेळगावला एका पिंगळेगल्ली आहे. तिथे पिंगळ्याची वस्ती पूर्वी, आणि कदाचित अजूनही असावी.
पिंगळा म्हणजे कुडमुडे जोशी अशीही माहिती आहे.
हे सुद्धा पहा
- पिंगळा हा घुबडाचा एक प्रकार आहे.
- भटके कलावंत आणि भिक्षेकरी
संदर्भ आणि नोंदी
- ^ Puṇe itihāsa darśana: Kalā (saṅgīta, nr̥tyakalā, raṅgabhūmī, citrapaṭa, lokakalā, va itara kalā). Bhāratīya Itihāsa Saṅkalana Samitī. 1993.