Jump to content

पहिले बाल्कन युद्ध

पहिले बाल्कन युद्ध
बाल्कन युद्धे ह्या युद्धाचा भाग

दिनांक ८ ऑक्टोबर, १९१२ — ३० मे, १९१३
स्थान बाल्कन द्वीपकल्प
परिणती बाल्कन लीगचा विजय
युद्धमान पक्ष
ओस्मानी साम्राज्यबाल्कन लीग:
बल्गेरिया ध्वज बल्गेरिया
सर्बिया
ग्रीस
मॉंटेनिग्रो
सैन्यबळ
३,३६,७४२ ७,४९,५००

पहिले बाल्कन युद्ध इ.स. १९१२ ते १९१३ दरम्यान सर्बिया, ग्रीस, मॉंटेनिग्रो व बल्गेरिया विरुद्ध ओस्मानी साम्राज्य असे झाले, ह्या युद्धात संख्येने अधिक व डावपेचात निपुण असलेल्या बाल्कन राष्ट्रांनी ओस्मानी सैन्याला पराभूत केले. ह्या पराभवामुळे ओस्मानी साम्राज्याचा युरोपामधील जवळजवळ सर्व सत्ता संपुष्टात आली. ह्याची परिणती स्वतंत्र आल्बेनिया देशात झाली.

युद्धात विजय मिळवून देखील बल्गेरियाच्या वाट्याला मॅसिडोनियामधील फारसा भूभाग न आल्यामुळे बल्गेरिया नाराज झाला. ह्यातच दुसऱ्या बाल्कन युद्धाची मुळे रोवली गेली. तसेच १९१० च्या दशकामधील इतर घटनांचा विचार करता पहिल्या महायुद्धाच्या कारणांमध्ये बाल्कन युद्ध हे एक प्रमुख कारण मानले जाते.

महासत्तांची प्रतिक्रिया

युरोपामधील तत्कालीन बलाढ्य राष्ट्रे ह्या युद्धामध्ये सहभागी नसली तरीही येथील घडामोडींवर त्यांचे बारीक लक्ष होते.

  • रशियाचा बाल्कन लीगच्या स्थापनेत मोठा सहभाग होता. बाल्कन लीगच्या विजयामुळे ऑस्ट्रिया-हंगेरीवर लक्ष ठेवणे रशियाला सुकर होते.
  • फ्रान्सचा बाल्कन युद्धाला संपूर्ण विरोध होता व आपण युद्धात उतरणार नसल्याचे फ्रान्सने रशियाला कळवले.
  • ब्रिटनचा ओस्मान्यांना पाठिंबा होता. परंतु युद्धानंतरच्या वाटणीमध्ये बल्गेरियाला अधिक भूभाग मिळणे तसेच त्राक्या प्रदेशावर रशियापेक्षा बल्गेरियाचे अधिपत्य ब्रिटनच्या दृष्टीने फायदेशीर होते.
  • जर्मनीने ओस्मान्यांना पाठिंबा देत ह्या युद्धाला विरोध दर्शवला. परंतु बल्गेरियाला आपल्या गोटात सामील करून घेण्यासाठी जर्मनीने सुप्त हालचाली सुरू केल्या.


बाह्य दुवे


संदर्भ